You are currently viewing ज्ञानेश्वर माऊली

ज्ञानेश्वर माऊली

ज्ञानियांचा राजा ! मराठीये संत !!
महा बुद्धिवंत ! ज्ञानेश्वर !!

विठ्ठल रुक्मिणी ! माय बाप होती !!
देह त्याग देती ! प्रायश्चित्त !!

विद्वत्ता दाविली ! पैठण जाऊनी !!
भिक्षा ती मागूनी ! समाजात !!

निवृत्ती हे गुरू ! गुरूंच्या कृपेने !!
मराठीचे लेणे ! मेळवीन !!

भाषा अभिमान ! मराठी महती !!
किती बोलविती ! ज्ञानेश्वरी !!

अमृतानुभव ! तत्वज्ञान श्रेष्ठ !!
दूर करी क्लिष्ट ! धर्मातील !!

चांगदेव योगी ! गर्वाचे हरण !!
माऊली चरण ! उपदेश !!

एकवीस वर्षी ! इंद्रायणी काठी !!
ज्ञानसूर्य होती ! समाधीन !!

(दिपी)✒️
दीपक पटेकर, सावंतवाडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

14 − six =