You are currently viewing आता सांज होत आली
Oplus_16908288

आता सांज होत आली

*ज्येष्ठ लेखिका कवयित्री कला शिक्षिका स्वप्नगंधा सतीश आंबेतकर लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*आता सांज होत आली*

 

 

आता सांज होत आली

आली मावळतीस लाली

धरती अन्धारात न्हाली

सपने डोळ्यात आली

/1/

कसेतरी खाऊनदोन घास

सोडला दिसभराचा उपास

रोज करावा लागे वनवास

पोटासाठी करीत प्रयास

/2/

चारा आणाया जावे रानात

चूल पेटावया सर्पण वनात

नसले जरी काही मनात

कष्ट लिहीलेच नशीबात

/3/

कन्दमुळे गोळा करीत

फळे कोणती रानसरीत

काट्याची वाट तुडवीत

सांजला यावे पडवीत

/4/

गुरे हंबरती दावणीत

चारा चघळती गोठ्यात

पोरे,भाकरी चटणीत

ढकलती घास पोटात

/5/

भरतार गेले ठेऊनी संसार

मागे, कसा आणावा उभार

कासाविसी नको उपासमार

सपनात मिळे तेन्चा आधार

/6/

 

 

स्वप्नगंधा सतीश आंबेतकर

कलाशिक्षिका.

प्रतिक्रिया व्यक्त करा