You are currently viewing मिटवता येईल का

मिटवता येईल का

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री अरुणा दुद्दलवार लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*मिटवता येईल का*

 

मिटवता येईल

नात्यात येणारी दरी

संवेदना अंतरी

असावी…‌..

 

जेष्ठ मंडळी

पिढीत होतो दुरावा

समजून घ्यावा

विचार….

 

अनुभवांचा खजिना

असतो भरपूर जवळ

सांगतात केवळ

जीवनोपयोगी….

 

आप्त मित्रांचे

भिन्न भिन्न स्वभाव

विचार प्रभाव

वेगवेगळे….

 

ऐकून सगळ्यांचं

विचार आपला करावा

व्यक्त करावा

समंजसपणे….

 

घर गृहस्थीत

अनेक मतं असतात

घ्यावे लागतात

समजून…..

 

आजकालची मुलं

चौकस असतात फार

शिकवावे संस्कार

गोष्टीतून….

 

मिटवता येते

अंतर मना मनाचे

समजून वागायचे

सर्वांनी….!!

 

~~~~~~~~~~~~~~~

अरुणा दुद्दलवार @✍️

प्रतिक्रिया व्यक्त करा