You are currently viewing मायबोली

मायबोली

जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य राष्ट्रीय प्रतिभा पुरस्कारित ज्येष्ठ लेखक कवी प्रो.डॉ.जी आर उर्फ प्रवीण जोशी यांची मराठी दिनाच्या निमित्ताने लिहिलेली अप्रतिम काव्यरचना

सह्याद्री चे पाणी झुळ झुळ
पडे कंपारीतून होते निर्मळ
मनातुन झरतो मरहट्ट हा
होते रचना अमृत प्रांजळ

मायबोलीचे करता पुजन
स्त्रवते रांगडी भाषा ओंजळ
वागेश्वरी ला करता आवाहन
पडती शब्द ओज्वळ सोज्वळ

शब्द अलंकार अंकुर फुटता
साद देतो तो मायेने आईस
गाय हंबरते देखता पाडीस
फुटे पान्हा निव्वळ मधाळ

तप्त तव्यावर फुटती लाह्या
शब्द बिलगती गाणी गाया
सप्तरंगी च्या इंद्रधनुवर
माय बरसते मधुर रसाळ

काव्य असावे अक्षर प्रांजळ
जसे वाजते बासरी मंजुळ
जशी काया राधा नित्तळ
लेणी घडावी सुंदर कातळ

संत महात्मे इथे रांधले
अभंग भारुड दिंड्या गायिले
ज्ञानियाचा राजा होता मंगळ
किर्तनास त्याच्या होई वर्दळ

यवनांची वाढता सळ सळ
नराधमाची होई कत्तल
हरहर महादेव नारा ऐकुनी
जागे झाले बारा मावळ

माय भवानी अंबाबाई
सदा आशीर्वाद तिझा पाठीशी
तिच्या नावानं वाजवतो सम्बळ
सारस्वतांचा घालतो गोंधळ

प्रो डॉ जी आर उर्फ प्रवीण जोशी

अंकली बेळगाव
कॉपी राईट

प्रतिक्रिया व्यक्त करा

1 × four =