*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ कवी विनायक जोशी लिखित अप्रतिम काव्यरचना*
*शिल्लक ठेवून आपला माज*
मोकळी ढाकळी मस्त नाचली
कशाला बाळगायची भीड कुणाची
आपले अंगण आपण नाचायचे
पर्वा कशाला *व्यर्थ करयची*
1
होता इशारा घुसायचे बिनधास्त
होते तृप्ती *नंतर कधीतरी*
फालतू प्रश्नांना *बाहेर ठेवून*
आपण रंगवायची रात सारी
2
बदल म्हणुनिया कधीतरी
गायची कोठीवर *ठुमरी*
सोवळे राहून बावळे न दिसावे
वेळेस यावे आपण चालत घरी
3
भेटून जात कुठल पाखरू
हाणावी *शिट्टी* एक सरस
लागल गळाला जर का राया
आनंद लुटावा जसा *शिरस*
4
भिजून पावसात कोरडे रहावे
कला शिकावी *बाजारात*
मिळून जातो एखादा *गुरू*
घरोबा नाही करायचा मनात
5
ठेवून थोडे *अंतर दोघात*
मजा करावी घेऊन अंदाज
खानदानी म्हणतात अशाला
शिल्लक ठेवून आपला माज
6
विनायक जोशी🖋️ ठाणे
मीलनध्वनी/9324324157
