You are currently viewing वैभववाडी तहसीलदार कार्यालयामध्ये मिशन वात्सल्य योजना

वैभववाडी तहसीलदार कार्यालयामध्ये मिशन वात्सल्य योजना

 

वैभववाडी तहसीलदार कार्यालयामध्ये दिनांक २५ ऑगस्ट २०२२ रोजी सकाळी १० ते संध्याकाळी ५.०० या वेळेत मिशन वात्सल्य योजनेअंतर्गत कोविड १९ च्या प्रादुर्भावामुळे एकल/विधवा महिलांसाठी ‘शिबिर एक – लाभ अनेक’ या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

या उपक्रमात शासनाच्या विविध २४ योजनांचा लाभ एकाच वेळी एकाच दिवशी लाभार्थ्यांना देण्यात येणार आहे.

वैभववाडी तालुक्यातील कोविड – १९च्या प्रादुर्भावामुळे एकल/विधवा महिलांनी उपस्थित राहून आपल्या कागदपत्रांमध्ये असलेल्या त्रुटींची पूर्तता शिबिरामधील संबंधित टेबलकडे पूर्ण करण्याचे आहे व त्याच दिवशी पूर्ण कागदपत्रे कार्यालयात सादर करण्याची आहेत.

कोणीही लाभापासून वंचित राहू नये याकरिता सर्वांनी शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन वैभववाडी तहसिलदार श्री. रामदास झळके यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा