कणकवली शहरात गडगडाट सह बरसल्या जोरदार पावसाच्या सरी

कणकवली शहरात गडगडाट सह बरसल्या जोरदार पावसाच्या सरी

कणकवली

शहरात आज मुसळधार पावसाच्या सरी कोसळु लागल्या. यात शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. काजु, आंबे, भुईमुग अशा अनेक पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. आज अचानक आलेल्या पावसामुळे कणकवली शहरात लोकांची तारांबळ उडाली होती. या पावसामुळे सर्व्हिस रोड व त्या बाजुने मारलेल्या गटारात पाणी साचलेले दिसुन आले. कणकवली शहरात गडगडाट होत पाऊस पडल्यामुळे लाईट ये जा होत आहे, अशामुळे व्यापारी वर्गात नाराजी व्यक्त केली जात आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा