You are currently viewing जून अखेरपर्यंत पाणीकपातीचा निर्णय; ४८ दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा

जून अखेरपर्यंत पाणीकपातीचा निर्णय; ४८ दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा

*जून अखेरपर्यंत पाणीकपातीचा निर्णय; ४८ दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा*

*मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या वैतरणा, मोडकसागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार, तुळशी या सातही धरणांतील पाणीसाठा वेगाने कमी होत आहे.*

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : पावसाळा लांबल्याने आणि मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरणांतील पाणीसाठा वेगाने कमी होत असल्याने मुंबईकरांवर पाणीकपातीची टांगती तलवार आहे. मात्र जूनअखेरीस सातही धरणांचा आढावा घेऊनच पाणीकपातीचा निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू यांनी दिली.

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरणांची पाणी साठवण क्षमता १४ लाख ४७ हजार ३६३ दशलक्ष लिटर आहे. या सातही धरणांतून दररोज ३ हजार ८५० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा करण्यात येतो. पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांत सध्याच्या घडीला २ लाख ५० हजार ६९१ दशलक्ष लिटर पाणीसाठा आहे. यामध्ये राज्य सरकारच्या अप्पर वैतरणा आणि भातसा या दोन धरणांतील राखीव कोट्यातील प्रत्येकी ७५ हजार दशलक्ष लिटर पाणीसाठाही आहे. त्यामुळे एकूण १५.६९ टक्के पाणीसाठा असून तो ४८ दिवस पुरेल, असे त्यांनी सांगितले.

अप्पर वैतरणा आणि भातसा या राज्य सरकारच्या दोन धरणांतून राखीव पाणीसाठा मिळत असला तरी अन्य धरणांत पाणीसाठा कमी आहे. पाऊस लांबल्यास पाणीकपातीचा निर्णय होऊ शकतो. त्यामुळे जूनअखेरीस मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांतील पाणीसाठ्याचा आढावा घेऊनच पाणीकपातीचा निर्णय घेण्यात येणार आहे.

पाणीपट्टीत प्रत्येक वर्षी कमाल आठ टक्क्यांपर्यंत वाढ करण्यास मुंबई पालिकेने सन २०१२ मध्ये मंजुरी दिली आहे. त्यानुसार, सन २०२३-२४ या वर्षासाठी मुंबई महापालिका १६ जूनपासून पाणीपट्टीत वाढ करण्याच्या विचारात होती. ही वाढ ७.१२ टक्क्यांपर्यंत होण्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र, पाणीपट्टीवाढीला भाजपकडून विरोध करण्यात आला होता.

 

*संवाद मिडिया*

*🧑🏻‍🎓प्रवेश..सुरू ! प्रवेश..सुरू ..!! प्रवेश..सुरू ..!!!🧑🏻‍🎓*

📣 *B. C. A. DEGREE*

*BCA Degree ला ॲडमिशन म्हणजे संगणक क्षेत्रात करिअर करण्याची सुवर्णसंधी.*🧑‍💻🧑‍💻

*👉 प्रवेश पात्रता…*
*▪️प्रथम वर्ष बीसीएकरिता: कोणत्याही शाखेची बारावी परीक्षा (गणित किंवा गणिताशिवाय) किमान ४५ टक्के व मागासवर्गीयांसाठी ४० टक्के गुणांसह उत्तीर्ण किंवा अभियांत्रिकी पदविका उत्तीर्ण*
*▪️थेट द्वितीय वर्ष बीसीएकरिता: डिप्लोमा पदवीका प्रथम श्रेणीत उत्तीर्ण (सिव्हिल इंजिनियर व्यतिरिक्त)*
*▪️मर्यादित प्रवेश उपलब्ध*

*संपर्क:*
*महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था, कॉलेज ऑफ कॉम्प्युटर ॲप्लिकेशन फॉर वुमन्स*
*(एसएनडीटी महिला विद्यालय, मुंबई संलग्न)*
*साखरतर रोड, शिरगाव, रत्नागिरी*

*📱 ७९७२९९७५६७, ९४२०२७४११९*

*Advt Link*
https://sanwadmedia.com/98807/
———————————————-

प्रतिक्रिया व्यक्त करा