You are currently viewing थेट सरपंच पदाच्या निवडणुकीत निलिमा परुळेकर यांचा सलग दुसऱ्यांदा विजय

थेट सरपंच पदाच्या निवडणुकीत निलिमा परुळेकर यांचा सलग दुसऱ्यांदा विजय

सर्जेकोट – मिर्याबांदा ग्रा. पं. वर भाजपाचा झेंडा

मालवण

नुकत्याच झालेल्या ग्रा. पं. निवडणुकीत काही ठिकाणी धक्कादायक निकाल लागले. तर काही ठिकाणी आपले गड मजबूत ठेवण्यात विद्यमान पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्त्याना यश आले आहे. असाच एक गड म्हणजे मालवण तालुक्यातील सर्जेकोट मिर्याबांदा ग्रामपंचायत ! ही ग्रामपंचायत मागील १५ वर्षांपासून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत आहे. यंदाच्या ग्रा. पं. निवडणुकीत ही ग्रामपंचायत आपल्या ताब्यात घेण्यासाठी विरोधकांनी प्रयत्नांची पराकाष्टा केली. मात्र सरपंच पदासह ७ पैकी ६ जागा मिळवून भाजपच्या कार्यकर्त्यांनी या ग्रा. पं. वरील सत्ता अबाधित ठेवली . नीलिमा परुळेकर या सलग दुसऱ्यांदा थेट सरपंच पदाच्या निवडणुकीत विक्रमी मताधिक्याने विजयी झाल्या आहेत.

मालवण तालुक्यातील सर्जेकोट ग्रामपंचायत २००५ पासून केंद्रीयमंत्री नारायण राणे यांच्या पाठीशी उभी राहिली आहे. जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष कृष्णनाथ तांडेल यांच्या नेतृत्वाखाली या गावच्या ग्रा. पं. वर राणेंच्या विचारांची सत्ता कायम आहे. यंदाच्या ग्रामपंचायत निवडणुकीत या ग्रा. पं. वर सत्ता मिळवण्यासाठी विरोधकांकडून मोर्चेबांधणी करण्यात आली होती. मात्र केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या माध्यमातून आणि जि. प. सदस्या सौ. सरोज परब यांच्या प्रयत्नातून गावाचा झालेला सर्वांगीण विकास विचारात घेऊन येथील ग्रामस्थांनी पुन्हा एकदा राणेंच्या बाजूने राहण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे ग्रामपंचायत ताब्यात घेण्याचे स्वप्न पाहून निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या विरोधकांना ग्रा. पं. च्या केवळ एका जागेवर समाधान मानावे लागले आहे.

निलिमा नितीन परुळेकर यांना मागील ग्रा. पं. निवडणुकीत मतदारांनी थेट सरपंच पदाची संधी दिली होती. मागील पाच वर्षात त्यांच्या माध्यमातून झालेल्या विकास कामांची पोचपावती म्हणून यंदाच्या ग्रा. पं. निवडणुकीत पक्षाने त्यांना पुन्हा एकदा सरपंच पदाची उमेदवारी दिली. हा विश्वास सार्थ ठरवत सौ. परुळेकर यांनी सरपंच निवडणुकीत आपल्या प्रतिस्पर्धी उमेदवार पूजा गोपाळ कवटकर यांचा ३५९ मतांनी पराभव केला आहे. सौ. परुळेकर यांना ४७६ तर कवटकर यांना ११७ मते मिळाली. या ग्रा. पं. मध्ये मतदारांनी भाजपा पुरस्कृत पॅनलला ७ पैकी ६ जागांवर यश मिळवून दिले आहे. सुनील नारायण खवणेकर, रोहित रत्नखचित आडकर, उषा दामोदर मुंबरकर, वैशाली गजानन आडकर, लक्ष्मी प्रसाद पाटील, लक्ष्मीकांत संजय सावजी या भाजपच्या उमेदवारांनी विजय मिळवला आहे. तर शिवसेना ठाकरे गटाला भारती तुळशीदास आडकर यांच्या रूपाने एकमेव विजय मिळवता आला. भाजपच्या विजयासाठी कृष्णनाथ तांडेल, माजी जि. प. सदस्या सरोज परब, बाळ आंबेरकर, दाजी कोळंबकर, दादा सावजी, आबू आडकर, प्रसाद पाटील, भाऊ जोशी, भगवान मुंबरकर, नितिन आंबेरकर, गोपीनाथ तांडेल, सुनील खवणेकर, नितीन परुळेकर यांच्यासह अन्य पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले

प्रतिक्रिया व्यक्त करा