You are currently viewing रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कबड्डी खेळाडूंची २० जून रोजी कणकवली येथे बैठक

रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कबड्डी खेळाडूंची २० जून रोजी कणकवली येथे बैठक

शिव छत्रपती पुरस्कार विजेते शिबीर रवींद्र करमळकर यांची उपस्थिती

कणकवली :

रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कबड्डी खेळाडू यांना राज्य आणि राष्ट्रीय स्थरावर खेळण्याची संधी मिळावी तसेच खेळाडूंना शासनाच्या ५ टक्के आरक्षित कोट्यातून नोकरी मिळावी. खेळाचा प्रचार व प्रसार व्हावा याकरिता मार्गदर्शन व प्रशिक्षण शिव छत्रपती पुरस्कार विजेते शिबीर रवींद्र करमळकर यांच्या प्रमुख उस्थितीत आयोजित करण्यात आले आहे. २० जून रोजी सकाळी १० वा. कणकवली तेली आळी येथे ही मीटिंग होणार आहे. अशी माहिती सिंधुदुर्ग येथील ज्येष्ठ शेतकरी बाळासाहेब सावंत यांनी दिली.
तसेच कबड्डी खेळाच्या प्रोस्ताणार्थ जिल्हास्तरीय स्पर्धांचे आयोजन करणे याकरिता ते कार्यरत आहोत. जिल्ह्यातील कबड्डीपटू ,खेळाडू, कोच, आणि कबड्डी प्रेमी,
या सर्वांच्या सहकार्याने या विषयाबाबत चर्चा विचारविनिमय करण्याकरिता कबड्डीपटू,आणि कबड्डी प्रेमी, यांची ही २० जून रोजी मीटिंग आयोजित करीत आहोत.अधिक माहिती साठी 8082600632 मोबई वर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

18 + four =