You are currently viewing पर्यावरण—-जाण..भान

पर्यावरण—-जाण..भान

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा. सदस्या लेखिका कवयित्री मंजिरी अनसिंगकर लिखित अप्रतिम लेख*

*”पर्यावरण—-जाण..भान”*

चला करू या निसर्ग सहल
हिरवा डोंगर,निळा सागर
रंगीत रानफुले सुंदर मनोहर
मोहवती धवल शुभ्र हिमशिखरं

निसर्गाच्या सान्निध्यात फेरफटका मारला की किती ताजेतवाने वाटते न!ते हिरवे सोनेरी डोंगर माथे..ते खळाळत झेपावणारे जलप्रपात.. ती बर्फाच्छादित हिम शिखरे…ती सागराची निळाई…ते निळे आकाश..ते नभीचे उगवतीचे..मावळतीचे केशरी रंग ..श्यामल सावळे मेघ..पक्षांचे विहरणारे थवे.. सुंदर विविधरंगी फुलांचे ताटवे. हिरवाईने नटलेली धरा….मन अगदी फुलाप्रमाणे टवटवीत उल्हसित होऊन, फुलपाखरू बनते हो न! पण दिवसेंदिवस असा नजारा दिसणे मुश्कील होतय.आज प्रणिताचे याच विषयावर, “पर्यावरण—-जाण भान” विषयावर शाळेत व्याख्यान होते नि त्यासाठी ती तयार होत होती.‌

तिच्या व्याख्यानाला सुरुवात झाली तशी शांतता पसरली.‌ती बोलू लागली—-लोकसंख्या वाढत गेली तशी बेसुमार वृक्षतोड,जंगलतोड झाली.‌माणसाने स्वतःला रहाण्यासाठी पर्यावरणाचे असे नुकसान केले.त्यामुळे पर्यावरणाचे संतुलन बिघडले.‌ फळे फुले देणारी..सावली देणारी झाडी नष्ट झाली. जंगले नष्ट झाली.प्राणी पक्ष्यांची घरे हरवली. जंगलतोडीमुळे पर्जन्यमान कमी झाले.‌वैश्विक उष्णतामान वाढले.‌ पावसाच्या कमी प्रमाणामुळे फुलं,फळं अन्नधान्याबरोबरच पाण्याचे स्रोतही कमी झाले.,नि पर्यावरणाच्या -हासाला सुरुवात झाली पर्यावरणाचे संतुलन बिघडले.‌
त्यावर उपाय म्हणून आता झाडे लावा झाडे जगवा..पाणी अडवा पाणी जिरवा असे उपक्रम सरकारी पातळीवरून नि सामाजिक संस्थांकडून राबविले जात आहेत. यांत विद्यार्थ्यांनीही आपला खारीचा वाटा उचलावयास हवा. चला तर मग,येत्या पावसाळ्यात प्रत्येकाने एक तरी झाड लावायचेच नि जगवायचे सुद्धा बरं का! असा संकल्प करू या.
माणूस हा बुद्धीमान प्राणी आहे.‌पण त्या बुद्धीचा योग्य वापर व्हायला हवा की नाही?पण माणूसच प्रदूषण वाढवित आहे.कचरा,..सांडपाणी .. औद्योगिक कारखान्यातील दूषित पाणी..नदी नाल्यात सोडले जात आहे.‌ते पाणी प्रदूषित होतेय नि त्याचा वापर करण्याने.. पाण्याने रोगराई पसरत आहे.‌तेव्हा हे सगळे थांबवायला हवे न!आता मुलांनीच दृढ निश्चय करायचा की,कचरा, सांडपाणी नदीत नाल्यांत टाकणार नाही. सार्वजनिक स्थळी प्लास्टिक बाटल्यांचा कचरा..कागदाचा कचरा करणारनाही.नदी नाल्यात अंघोळ करणे,कपडे धुणे इ.गोष्टी टाळून पाणी प्रदूषित करणार नाही.असा निश्चय करायला हवा.
पाणी म्हणजे जीवन न! पाण्यावाचून पशु,पक्षी माणूस राहू शकतो का? नाही न!मग सगळ्यांना शुद्ध पेयजल मिळावे..वापरायला ही स्वच्छ पाणी मिळावे… त्यांचा वाया न घालवता योग्य वापर व्हावा यासाठी आपण सर्वांनीच प्रयत्नशील असले पाहिजे.

मानवाने आता खूप प्रगती केली आहे.त्याचे जीवन सुखकर व्हावे यासाठी वेगवेगळे शोध लावले.‌वाफेवर चालणारी आगगाडी आता विजेवर चालते. झुकझुक झुकझुक अगीन गाडी धुरांच्या रेषा हवेत काढी,पळती झाडे पाहूया …..ही आगगाडी आता इतिहासजमा झालीय, नि पळणारी झाडेही आता कमी झालीत.

पण आगगाडी किंवा इतर उपकरणे चालण्यासाठी वीज तर हवी न! त्यासाठी पाणीसाठा हवा. पाणी वाहून जाऊ नये यासाठी धरणे ,तलाव शेततळी व्हायला हवीत. हो न! आपल्यापरीने आपणही प्रयत्न करायला हवेत. पाण्याचा योग्य वापर करायला हवा. पाणी वाया जाता कामा नये. पावसाचे पाणी साठवून ठेवण्यासाठी घरगुती टाकीचा वापर करायला हवा.‌

स्कूटर्स,कार यासाठी पेट्रोल,डिझेलचा सर्रास वापर होतो. ही वाहने हवेचे प्रदूषण करतात.‌ ज्या उद्योग धंदे कारखान्यातून धूर सोडला जातो ,तो धूर हवेच्या प्रदूषणांत भरच घालतो. त्यालाही आळा घालावा लागेल.‌सजीवांना स्वच्छ मोकळी शुद्ध हवा मिळायला तर हवीच! तरच माणसाचे जगणे सुकर होईल न! शुद्ध हवेसाठी ऑक्सिजन सोडणारी झाडे मोठ्या प्रमाणात लावायला हवी. चला तर मग ,आपणही अशी झाडे—वड,पिंपळ, कडुनिंब लावू या .तुम्हा मुलांना व पुढच्या पिढ्यांना सुखाचा मोकळा श्वास घेता यावा म्हणून एवढं तर करायलाच हवे.,नाही का!

सध्या ध्वनी प्रदूषणही वाढत आहे. वाहनांचे कर्कश आवाज, डी. जे चा आवाज , मोठमोठ्या मशीनचे आवाज ,प्रदूषण वाढवतात. यासाठी सार्वजनिक वाहनांचा वापर जास्तीत जास्त करायला हवा. सण ,समारंभ, विवाहसमारंभ यावेळीही मोठमोठ्याने गाणी लावली जातात . कुणाची परिक्षा असते,कुणी आजारी असतात,कुणाकडे वृद्ध मंडळी असतात. त्यांना आवाजाचा त्रास होऊ शकतो, ह्याची जाणीव ठेवली पाहिजे. सोसायटीत, शेजारी त्रास होणार नाही.याची काळजी आपणच घ्यायला हवी नाही का!सण समारंभ साजरे करा पण दुस-याला त्रास होणार नाही याचीही काळजी घ्या.

या वातावरणातील प्रदूषणामुळे पर्यावरणाचे संतुलन बिघडत चालले आहे. कधी बेसुमार पाऊस तर कधी अवकाळी पाऊस…कधी त्सुनामी तर कधी ज्वालामुखी स्फोट..कधी जंगलाच्या जंगले आगीत भस्मसात होतात तर कधी भूस्खलन…कधी भूकंप….निसर्गाचा ‌‌…वातावरणाचा समतोल बिघडल्याचेच हे निदर्शक आहेत. हे संतुलन पूर्ववत व्हावे यासाठी अत्यंत प्रयत्नशील असणे खूप गरजेचे झाले आहे.

या निसर्ग प्रदूषणासोबतच माणसाच्या मनामनातील…नात्या नात्यातील.. जातीजातीतील मानसिक कुविचारांचे प्रदूषणही दूर करण्याची गरज आहे. ही जबाबदारी आता तुम्हा मुलांनी..तरूणांनी..उचलावयास हवी.कुटुंब एकोप्याने रहायला हवे. व्यस्त जीवनशैलीतून त्यासाठी वेळ काढून घरातील मुलांना ..वृद्धांना वेळ द्यायला हवा. समज गैरसमज दूर करून,मनातील किल्मीषे दूर सारून, नात्यातील गोडवा टिकवायला हवा. गांठीभेटी वाढवायला हव्यात. संकटकाळी आधार.. हिंमत द्यायला हवी. माणूसकी जपायला हवी.कुटुंब हाच भारतीय संस्कृतीचा मूलाधार आहे….ताकद आहे. कुटुंबांनीच समाज बनतो. सामाजिक एकोपा..समरसता व्हायलाच हवी. समाज एकसंघ राहिला तरच देश प्रगती करू शकेल ,हो न! नि हे आता तुम्हा मुलांच्या..तरूणांच्या हातात आहे. पुढच्या पिढीसाठी.. त्यांच्या सुखासाठी ..नि देशप्रगतीसाठी हे करायलाच हवे.

मुलांनो तुम्हीच भारताचे उद्याचे नागरिक आहात.. आपला देश प्रदूषण मुक्त व्हावा.. पर्यावरण संतुलन राखले जावे.. म्हणून आतापासूनच चांगल्या सवयी लावून घ्या. काही वर्षांनी का होईना पण हा निसर्ग पुन्हा बहरेल…खुलेल..शांत ..शीतल थंड हवा…स्वच्छ निर्मळ पाणी…वा-यासवे डोलणारी फुलं..पानं..हिरव्या शिवारातील पिकं.. रिमझिम पाऊसधारा…आकाशात मुक्तपणे संचार करणारे पक्षी..हिरव्या पानातून डोकावणारे सोनेरी कवडसे.. इंद्रधनुष्य… खळाळणारे झरे..नद्या…केशरी शिंपण ल्यायलेले सुंदर क्षितीज…निळा अथांग सागर….हे सर्व पुन्हा नव्याने अनुभवता येईल पण त्यासाठी प्रयत्नांत सातत्य हवे .नुसता पर्यावरण दिन साजरा करून होणार नाही. येत्या पांच जूनला पर्यावरण दिन आहे तो आपण सर्वांनी झाडे लावून झाडे जगवून साजरा करू या. निसर्गाने आपल्याला भरभरून दान दिले आहे.त्याची जपवणूक करू या.त्यासाठी
प्रयत्नशील राहू या. हो न! कराल
न एवढे!

सौ.मंजिरी अनसिंगकर, नागपूर

 

*संवाद मीडिया*

*-💫🐏-🐓–-🐄-🐃– ✴️

*मैत्रेय ऍग्रो अँड वेट केअर*
*शेतकऱ्यांशी जिव्हाळ्याचे नाते*❤‍🩹

✴️ *मान्सून ऑफर* ✴️

*माय कॅल गोल्ड 24* & *माय मिन मिनरल* पावडर *माय लिवो टॉनिक*
*मोफत*

फक्त दुधाळ जनावरेच नाही तर कोंबडीच्या पिल्लांपासून,शेळी – बकरे व इतर जनावरांनाही लिव्हर टॉनिक, लिव्हर टॉनिक कमीत कमी एक दीड महिन्याच्या अंतराने आठ दिवस सतत वापरल्यास जनावरांच्या शरीरात Metabaiological बदल होत असल्याने चारा,खाद्यातून किंवा खाद्यावर बुरशी( Tocxic) आल्याने पचनक्रियेवर परिणाम होऊन आपण दिलेले खाद्य 100% अंगी लागत नाही त्याचा परिणाम आपल्या व्यावस्यावर होतो. याचा विचार करून *मैत्रेय ऍग्रो & वेट केअर* कंपनीने शेतकऱ्यांना माय कॅल गोल्ड 24 आणि माय मिन ( मिनरल्स) वर *माय लिवो टॉनिक* मोफत द्यायचे ठरविले आहे. त्याच बरोबर माय लिवो टॉनिक फक्त *MRP ₹ १००/-* मध्ये २००मिलि पॅक बाजारात उपलब्द केले आहे.
मैत्रेय ऍग्रो & वेट केअर च्या कोणत्याही प्रॉडक्ट्स च्या *गुणवत्ते* बाबत *पशुवैदेकीय अधिकाऱ्यांचा* सल्ला घ्यावा.

✴️ उत्पादने.

*Mai Cal X gel माय कॅल एक्स जेल*
👉.. 300ml सिंगल डोस..
गाय / म्हैस विण्यापूर्वी 6-12 तास अगोदर आणि विल्या नंतर 6 – 12 तासानंतर.अशक्त आणि उठवणीस आलेल्या जनावरांना.
*वाजवी किंमत रु 175/-*

*Mai Min Powder*+
मिनरल अँड व्हिटॅमिन—– ( मेथो चिलटेड ).🐃🐄🦌
👉 भरगोष वाढ, फ‌ँट मध्ये वाढ,वेळेवर गाभाला जाने आणि जनावर तंदुरुस्तची खात्री.

*🐮भरगोष दूध वाढीसाठी🥛*

*👉माय – कॅल गोल्ड 24* 🎯
Mai Cal Gold 24 ( कॅल्शियम लिक्विड)

*👉माय- ग्लुको सिरप* .. Mai Gluco Syrup.
त्वरित पाना सोडणे, 🐄 – लुळेपणा नाहीसा, दुधात वाढ, अंडी देण्याचा कालावधीत वाढ, कोंबडी एकमेकास बोचत नाहीत,🐓 नेहमी फ्रेश दिसून येईल.

*👉माय-लिओ टॉनिक*🫀🫁
भरपूर भूक लागणे, भरपूर गाणी पिणे, शुद्ध रक्तपुरवठा, पचनशक्तीत सुधारणा. फँट मध्ये नियमित पणा.

*👉माय सॉल्ट लिक्स* चाटण विटा
जनावर माती,दावी खात नाहीत, पचनक्रियेत सुधारणा सोबत कॅलसियम आणि इतर घटक

*👉माय- एम बी प्लेक्स* बी कॉम्प्लेक्स सिरप 💧🐓
( अँटी ट्रेस)
जनावर नेहमी फ्रेश,कोंबडी – वासरे – बकरे भरघोस वाढ, उष्णनेतेचा त्रास होत नाही. दुधाळ गायीना उष्णेतेचा त्रास न होता दुधात नियमितता.
*–👌– Mai Prozyme –👌*🐐🐃☘️
👉 बकरे / वासारे वजनात वाढ,
👉सर्व जनावरांची उत्तम पचणक्रिया
👉दुध उत्पादनात नियमितता.

*✅सर्व मेडिकल आणि पशु खाद्य दुकानातून उपलब्ध*

कोकणातील शेतकऱ्यांना दर्जेदार उत्पादने आणि मोठी सवलत देणारी, शेतकऱ्यांशी जिव्हाळ्याचे संबंध असणारी एकमेव स्थानिक कंपनी…
*मैत्रेय ऍग्रो अँड वेट केअर*
*रावराणे.*
*📲9987703088*
*📲7977602845*

🌎 Visit: www.mvetcare.com

*Advt link*

———————————————-

प्रतिक्रिया व्यक्त करा