You are currently viewing सत्ताधाऱ्यांच्या नाकर्तेपणामुळे कणकवलीत पाणी टंचाई

सत्ताधाऱ्यांच्या नाकर्तेपणामुळे कणकवलीत पाणी टंचाई

शिवाजीनगर , बिजलीनगर, नाथ पै नगर येथे सुशांत नाईक, रुपेश नार्वेकर यांनी स्वखर्चाने केला पाणीपुरवठा

कणकवली

गडनदीचे पात्र कोरडे पडल्याने शहरात तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे पाण्यासाठी नागरिकांना वणवण करावी लागत आहे. मात्र, न. पं. प्रशासन व तत्कालीन सत्ताधाऱ्यानी संभाव्य पाणी टंचाई लक्षात घेऊन कोणतेहि नियोजन न केल्यामुळे पाणी टंचाई उद्भवली आहे, असा आरोप युवासेनेचे जिल्हाप्रमूख तथा माजी नगरसेवक सुशांत नाईक यांनी केला.

सत्ताधाऱ्याच्या नाकर्तेपणामुळे कणकवली शहरात पाणी टंचाई निर्माण झाली आहे. न. पं. प्रशासन व भाजपचे पदाधिकारी मुख्यमंत्र्याच्या दौऱ्यात मशगुल आहेत. पाणी टंचाईमुळे कणकवलीकरांचे हाल सुरु आहेत.

शिवाजीनगर, बिजलीनगर, नाथ पै नगर येथे आपण व माजी नगरसेवक रुपेश नार्वेकर यांनी स्वखर्चातून नागरिकांना टँकरद्वारे पाणीपुरवठा केला आहे, श्री.नाईक यांनी बोलताना सांगितले.

 

प्रतिक्रिया व्यक्त करा