You are currently viewing फोंडा – घोणसरी रस्त्याचे काम होणार लवकरच सुरू सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांची ग्वाही

फोंडा – घोणसरी रस्त्याचे काम होणार लवकरच सुरू सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांची ग्वाही

भाजपा कणकवली तालुका उपाध्यक्ष मकरंद(छोटू) पारकर यांनी वेधले लक्ष

फोंडाघाट

महाराष्ट्र राज्यात नव्याने स्थापन झालेल्या भाजपा शिवसेना युतीच्या सरकारमधील सार्वजनिक बांधकाम, अन्न आणि नागरी पुरवठा,ग्राहक संरक्षण मंत्री कोकणचे सुपुत्र ना.रविंद्रजी चव्हाण हे मंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर प्रथमच सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते.त्यांनी या दौऱ्यामध्ये लोकांची विविध निवेदने स्वीकारली. यावेळी फोंडा – घोणसरी मुख्य रस्ता पूर्ण खराब होऊन वाहतुकीस अयोग्य बनल्याने केव्हाही अपघात होऊन जीवितहानी होण्याची शक्यता असल्याने तातडीने रस्त्याचे काम होण्याबाबत भाजपचे कणकवली तालुका उपाध्यक्ष मकरंद(छोटू) पारकर यांनी मंत्री महोदय यांचे लक्ष वेधले.यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री ना.रविंद्रजी चव्हाण यांनी लवकरच या कामाला मंजुरी देऊन दिवाळी नंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्याची ग्वाही दिली.यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष मा.राजन तेली,जिल्हा उपाध्यक्ष राजन चिके,जिल्हा सरचिटणीस प्रमोद रावराणे, मा.जिल्हा परिषद उपाध्यक्ष राजन म्हापसेकर,मा. जि.प.सदस्य सुधीर नकाशे आदि उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

five × one =