You are currently viewing राज्यस्तरीय कथाकथन स्पर्धेत नील बांदेकर प्रथम…

राज्यस्तरीय कथाकथन स्पर्धेत नील बांदेकर प्रथम…

सावंतवाडी

शिवाजी भोसले एज्युवर्ल्ड कोल्हापूर यांच्यावतीने आयोजित राज्यस्तरीय बोधकथा कथन स्पर्धेत बांदा केंद्र शाळेतील विद्यार्थी नील नितीन बांदेकर याने राज्यात प्रथम क्रमांक पटकविला आहे.त्याचे विविध स्तरातून कौतुक होत आहे.

त्याच्या या यशात बांदा केंद्र शाळेचे समस्त शिक्षक वृंद, मुख्याध्यापिका नाईक मॅडम, उपक्रमशील शिक्षक जे. डी पाटील सर त्याचबरोबर त्याचे आई-वडील श्री व सौ गौरी नितीन बांदेकर आणि नीलचे मामा प्रसिद्ध चाईल्ड स्पेशालिस्ट डॉ. उमेश उत्तम सावंत यांचे अनमोल असे मार्गदर्शन लाभले आहे .नील ने यापूर्वीही अनेक स्पर्धांमध्ये यश संपादन केलेले आहे .

प्रतिक्रिया व्यक्त करा