You are currently viewing इचलकरंजीत बास्केटबॉल स्पर्धेस प्रारंभ

इचलकरंजीत बास्केटबॉल स्पर्धेस प्रारंभ

इचलकरंजी/ प्रतिनिधी :

 

थोर स्वातंत्र सेनानी, देशभक्त बाबासाहेब खंजिरे यांच्या जन्म शताब्दी निमित्त बास्केटबॉल असोसिएशन कोल्हापूर,महाराष्ट्र यांच्या मान्यतेने व न्यू बास्केटबॉल असोसिएशन, इचलकरंजी यांच्या वतीने निमंत्रित संघांच्या बास्केटबॉल स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. या स्पर्धेस विविध मान्यवरांच्या उपस्थितीत प्रारंभ करण्यात आला.

 

येथील न्यू बास्केटबॉल मैदान,छ.शाहू महाराज पुतळा जवळ इचलकरंजी येथे या स्पर्धा होणार आहेत.या स्पर्धेचे उद्घाटन इचलकरंजी शहर कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष संजय कांबळे यांच्या हस्ते व सामाजिक कार्यकर्ते रणजीत लायकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले. यावेळी सचिन देवरुखकर, संजय कुडचे, खलील मैंदर्गी, राजू तिवारी,मिलिंद कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी बोलताना संजय कांबळे यांनी सांगितले की , देशभक्त बाबासाहेब खंजिरे यांच्या जन्मशताब्दी निमित्त शहरामध्ये सुरु असलेल्या क्रीडा स्पर्धांमुळे खेळाडूंना आपले कौश्यल दाखविण्याची चांगली संधी उपलब्ध झाली आहे.त्याबद्दल देशभक्त बाबासाहेब खंजिरे जन्म शताब्दीचे कार्याध्यक्ष राहुल खंजिरे यांचे कौतुक केले व याबाबत सर्वोतोपरी मदत करणार असल्याचे सांगितले.

यावेळी बोलताना शाहू कॉर्नर नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन रणजीत लायकर यांनी देशभक्त बाबासाहेब खंजिरे जन्मशताब्दी निमित्त सुरू असलेल्या स्पर्धांमुळे खेळाडूंना मोठे व्यासपीठ मिळाले असल्याचे नमूद केले.

देशभक्त बाबासाहेब खंजिरे जन्मशताब्दीचे कार्याध्यक्ष राहुल खंजिरे यांनी व्यसनाच्या विळख्यात अडकलेल्या युवा पिढीस मैदानावरील खेळात प्रोत्साहन देण्याकरिता सदर स्पर्धेचे आयोजन केले असल्याचे सांगितले

दरम्यान या स्पर्धेमध्ये कोल्हापूर मिरज घुणकी सांगली इचलकरंजी मधील 12 नामांकित संघ सहभागी झाले असून आज ऑल स्टार मिरज, घुणकी चॅलेंजर,भानू तालीम मिरज, नाईट कॉलेज कोल्हापूर यांनी आपल्या प्रतिस्पर्धी संघावर विजय मिळविला. सदर स्पर्धा यशस्वी करण्याकरिता न्यू बास्केटबॉल असोसिएशनचे अध्यक्ष संतोष पाटील, धीरज होगाडे, आकाश चव्हाण, किरण कोष्टी, आप्पा कुचेकर, संदीप जासूद, अमित यादव, सागर चौगुले, निलेश रावळ, ऋषिकेश कुडाळकर, अरविंद हणबर , चेतन खंडेलवाल यांनी परिश्रम घेतले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

11 − 4 =