You are currently viewing सावंतवाडी तालुक्याचा बारावीचा निकाल ९६.८६ टक्के

सावंतवाडी तालुक्याचा बारावीचा निकाल ९६.८६ टक्के

मिलाग्रीसची एरिका डिसोजा तालुक्यात प्रथम, एसपीकेचा ऐश्वर्यानंद सावंत द्वितीय तर रिया नाईक तृतीय

 

सावंतवाडी :

 

सावंतवाडी तालुक्याचा उच्च माध्यमिक शालांत परिक्षा २०२३ अर्थात बारावीचा निकाल ९६.८६ टक्के लागला. सावंतवाडी तालुक्यातून परिक्षेला प्रविष्ठ झालेल्या १६५७ विद्यार्थ्यांपैकी १६०५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यात मिलाग्रीस कनिष्ठ महाविद्यालयाच्या वाणिज्य शाखेची विद्यार्थीनी एरिका ऑगस्टीन डिसोजा ही ९१.३३ टक्के गुण मिळवीत तालुक्यात प्रथम आली. श्री पंचम खेमराज महविद्यालयाच्या वाणिज्य शाखेचा विद्यार्थी ऐश्वर्यानंद सावंत ९१ टक्के गुणांसह द्वितीय तर याच प्रशालेची रिया नाईक हिने ९०.५० टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक पटकावला. या वर्षीही तालुक्यातील मिलाग्रीस, सांगेली व आंबोली प्रशालांनी आपली १०० टक्के निकालाची परंपरा कायम राखली.

प्रतिक्रिया व्यक्त करा

1 + 12 =