You are currently viewing देवगड तालुक्यात मासिक पाळी व्यवस्थापन जनजागृती सप्ताह राबविणार : करिश्मा नायर

देवगड तालुक्यात मासिक पाळी व्यवस्थापन जनजागृती सप्ताह राबविणार : करिश्मा नायर

देवगड :

जागतिक पातळीवर २८ मे हा दिवस मासिक पाळी दिवस म्हणून साजरा केला जातो या वर्षीच्या जागतिक मासिक पाळी दिनानिमित्त ‘ आम्ही कटिबद्ध आहोत ‘ ही या सप्ताहाची थिम असणार आहे . या दिनाचे औचित्य साधून २२ ते २८ मे या कालावधीत जिल्हाच्या मार्गदर्शनानुसार देवगड तालुक्यात मासिक पाळी व्यवस्थापन जनजागृती सप्ताह राबवण्याबाबत नियोजण बैठक गटविकास अधिकारी श्रीम . करिश्मा नायर यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाली .यावेळी देवगड तालुक्यातील मास्टर ट्रेनर उपस्थित होते.

मासिक पाळी ही नैसर्गिक प्रक्रिया असून त्याबाबत असलेल्या अज्ञानापोटी निर्माण झालेल्या विविध रूढी परंपरांमुळे मुली -महिलांना मोठया प्रमाणात मानसिक व शारीरिक त्रासाला सामोरे जावे लागते . स्वच्छ भारत मिशन टप्पा दोन हा मासिक पाळी व्यवस्थापनाचा महत्त्वाचा घटक आहे . या पार्श्वभुमीवर या दिनाचे औचित्य साधुन तालुक्यात रॅली , चर्चासत्रे , प्रशिक्षण, प्रबोधन उपक्रमांद्वारे जनजागृती सप्ताह तालुका व ग्रामपंचायत स्तरावर राबविण्यात येणार असल्याची माहिती गटविकास अधिकारी पंचायत समिती देवगड श्रीम . करिश्मा नायर यांनी माहिती दिली.

प्रतिक्रिया व्यक्त करा

5 × 1 =