You are currently viewing गौरी-गणपती सणाच्या पार्श्वभूमीवर वीज वितरण कंपनीला मनसेचे निवेदन

गौरी-गणपती सणाच्या पार्श्वभूमीवर वीज वितरण कंपनीला मनसेचे निवेदन

गणेश चतुर्थी काळात वीज पुरवठा अखंडित सुरू राहण्याबाबत तसेच गणेश चतुर्थी काळात वीज जोडणी कापण्याची कारवाई थांबवावी, अश्या आशयाचे निवेदन वीज वितरण कंपनीच्या उपअभियंता यांना देण्यात आले.
गणेश चतुर्थीच्या काळात तालुक्यातील वीज पुरवठा खंडीत होऊ नये याची खबरदारी घ्यावी.अनेक ग्राहकांचे थकीत वीज बिल भरले नसल्याने वीज जोडणी कापण्याची कारवाई आपण करत आहात. ती त्वरित थांबवावी. गणेश उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा होत असल्याने व कोरोना काळात लोकांचे झालेले आर्थिक हाल पाहता वीजबिल भरण्यासाठी गणेश चतुर्थी काळात ग्राहकांवर दबाव आणु नये अशी मागणी आम्ही सावंतवाडी तालुका मनसेच्या वतीने करत आहोत.
सावंतवाडी तालुक्यातील तसेच गावपातळीवरील विद्युत पुरवठा हा पूर्णत: अनियमित असून विजेचा खेळखंडोबा झाला आहे त्यावर आपण त्वरित लक्ष देणे गरजेचे आहे त्याच प्रमाणे तालुक्यातील बऱ्याच ठिकाणी विद्युत पुरवठा केबल लगत असलेली झाडे वाढलेली असून त्यामुळे विद्युत पुरवठा खंडित होतो व त्यामुळे ग्राहकांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागते. अवघ्या काही दिवसांवर येणारा गणेशोत्सव हा सण मोठ्या प्रमाणावर साजरा होतो. सध्या गणेश मूर्ती शाळांमध्ये गणेश मुर्त्या बनविण्याची लगबग रात्रंदिवस सुरू असताना वीज पुरवठा खंडित होऊन व कमी होल्टेज होत असल्याने वीज कमी दाब स्वरूपात चालते या सगळ्याचा गणेश मूर्ती शाळांना मोठ्या प्रमाणात फटका बसतो विद्युत पुरवठा सुरळीत ठेवण्याकरिता संबंधित कर्मचार्‍यांना योग्य त्या सुचना द्याव्यात.आवश्यक ठिकाणी अधिक कर्मचारी तैनात ठेवावेत.
संपूर्ण तालुक्यातील विद्युत यंत्रणेची पाहणी करून योग्य ती उपाययोजना करावी तरी वरील सर्व बाबी लक्षात घेत सर्व कामे गणेश चतुर्थीपूर्वी व्यवस्थित करून घ्यावी व गणेश चतुर्थीच्या काळात वीज पुरवठा अखंडित सुरू राहील याची खबरदारी घ्यावी ही विनंती आम्ही या निवेदनाद्वारे करत आहोत यावेळी शहराध्यक्ष आशिष सुभेदार तालुका सचिव विठ्ठल गावडे उपशहर अध्यक्ष शुभम सावंत लक्ष्मीकांत हरमलकर ऋग्वेद सावंत अभय देसाई गौरव मुणंणकर गोविंदा मोरये धनंजय पाटकर आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

fifteen − 12 =