You are currently viewing सौ. श्रद्धा कदम सलग चौथ्यांदा आंतरराष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित..

सौ. श्रद्धा कदम सलग चौथ्यांदा आंतरराष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित..

कणकवली

विमा क्षेत्रातील सर्वोत्कृष्ट मानाचा समजला जाणारा आंतरराष्ट्रीय पुरस्कार MDRT कणकवली विमा शाखेतील विमा प्रतिनिधी सौ.श्रद्धा श्रीकृष्ण कदम यांनी सलग चौथ्या वर्षी मिळवून विशेष सन्मान प्राप्त केला आहे. सौ.श्रद्धा कदम या गेली पंचवीस वर्ष विमा व्यवसाय जनसेवा म्हणून करत असून कोल्हापूर विभागात त्यांनी आजपर्यंत अनेक सन्मान प्राप्त केले आहेत.

गेली बारा वर्षे त्या चेअरमन क्लब मेंबर आहेत. कणकवली येथे त्यांचे स्वतंत्र विमा व्यवसाय कार्यालय असून तेथे विमा हप्ता भरण्याची ही सुविधा उपलब्ध आहे. सलग चार वर्षे मानाच्या पुरस्काराने सन्मानित झाल्याने सौ.कदम त्यांचे विविध स्तरातून अभिनंदन होत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा