You are currently viewing अनधिकृत वाळू वाहतूक न रोखल्यास पूर्वकल्पना न देता रास्ता रोको करू – राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अमित सामंत

अनधिकृत वाळू वाहतूक न रोखल्यास पूर्वकल्पना न देता रास्ता रोको करू – राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अमित सामंत

कुडाळ

सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुरू असलेली अनधिकृत वाळू वाहतूक येत्या चार दिवसात रोखा अन्यथा कोणतीही कल्पना न देता राष्ट्रवादीच्या माध्यमातून रास्ता रोको करू, असा इशारा राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी दिला आहे. दरम्यान या अनधिकृत वाहतूकीमुळे अपघाताच्या संख्येत वाढ झाली आहे. कारवाईपासून वाचण्यापासून संबधित डंपर चालक भरधाव वेगाने गाड्या हाकत आहेत. काल झाराप येथे झालेला अपघात याचेच उदाहरण आहे. त्यामुळे आता कारवाई झाल्या शिवाय राष्ट्रवादी स्वस्थ बसणार नाही, असा इशारा सामंत यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिला आहे.

सद्या जिल्ह्यात वाळू डंपराच्या बेसुमार अणि बेदरकार वाहतूकीमुळे अपघातांचे प्रमाण दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढत आहेत, या अपघातामुळे सर्व सामान्य निरपराध लोकांचे नाहक बळी जात आहेत, काही कुटुंबे उद्ध्वस्त होत आहेत, काल परवा तेर्सेबाबर्डे, पिंगुळी काळसे, झाराप येथे झालेले अपघात किंवा यापूर्वी झालेले अपघात हे बेजबाबदार वाळू वाहतुकीच्या डंपर चालकामुळे होत आहेत, आणि महसूल, पोलीस, आरटीओ विभाग आपली जबाबदारी असुनही हे उघड्या डोळ्यांनी पाहत आहेत यांचे कारण सर्व सामान्य जनतेला कळतील का सद्या डंपराच्या बेजबाबदार वाहतूकीमुळे जे अपघात होत आहेत ते पाहता संबंधित विभागाने आपली जनतेच्या सुरक्षिततेसाठी असलेल्या, जबाबदारीची जाणीव ठेवून भविष्यात अशा अपघाताचे प्रकार थांबविण्यासाठी ठोस उपाययोजना करणे गरजेचे आहे, त्यासाठी जिल्ह्यातील महसूल आरटीओ, व पोलीस यंत्रणांनी यावर ठोस तोडगा काढण्यासाठी सर्वप्रथम कुडाळ मालवण रोड वरून कुडाळ पोस्ट ऑफिस समोरून सावंतवाडीच्या दिशेने जाणारी डंपर वाहतूक पूर्णपणे बंद करावी, संबंधित प्रशासनाने येत्या चार दिवसांत वाळू डंपराच्या वाहतूकीवर बंदी आणावी अन्यथा पूर्व कल्पना न देता राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून वाळू वाहतूकीचे डंपर बंद करण्यासाठी आंदोलन पुकारून सर्व वाळू वाहतूकीचे डंपर रास्ता रोको करुन अडविण्यात येणार, असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे जाहीर केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

twenty + one =