युवासेना प्रमुख मा. आदित्यजी ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त युवासेनेच्या वतीने कुडाळ येथे ऑक्सिजन कॉन्सनट्रेटर्स चे लोकार्पण

युवासेना प्रमुख मा. आदित्यजी ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त युवासेनेच्या वतीने कुडाळ येथे ऑक्सिजन कॉन्सनट्रेटर्स चे लोकार्पण

कुडाळ :

 

युवासेना प्रमुख मा. आदित्यजी ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त युवासेनेच्या वतीने गरजु नागरिकांकरिता शिवसेना शाखा कुडाळ येथे आवश्यकतेनुसार वापरण्याकरिता ऑक्सिजन कॉन्सनट्रेटर्स उपलब्ध करण्यात आलेला आहे. त्याचे आज लोकार्पण करण्यात आले.

याप्रसंगी डॉ सौदत्ती, जिल्हाप्रमुख मा. संजय पडते, युवासेना जिल्हाप्रमुख श्री मंदार शिरसाट, राजन नाईक, संतोष शिरसाट, बबन बोभाटे, अतुल बंगे, संजय भोगटे, कृष्णा तेली, राजू गवंडे, अमित राणे, सचिन काळप, बाळा वेंगुर्लेकर, मंजू फडके, जीवन बांदेकर, योगेश धुरी, कौशल जोशी, विकास राऊळ, गुरू राऊळ आदी उपस्थित होते.

तरी ऑक्सिजन कॉन्सनट्रेटर्सची आवश्यकता असणाऱ्यांनी शिवसेना शाखा कुडाळ येथे गोट्या चव्हाण 9518943847 संपर्क साधावा असे आवाहन युवासेना जिल्हाप्रमुख, श्री मंदार शिरसाट, यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा