You are currently viewing जामसंडे अपघातातील गंभीर जखमी असलेल्या तेजस बांदेकर या युवकाचे निधन

जामसंडे अपघातातील गंभीर जखमी असलेल्या तेजस बांदेकर या युवकाचे निधन

जामसंडे अपघातातील गंभीर जखमी असलेल्या तेजस बांदेकर या युवकाचे निधन

देवगड
जामसंडे येथे शनिवारी झालेल्या भीषण अपघातात गंभीर जखमी झालेल्या येथील तेजस तुषार बांदेकर(२५) या युवकाचे
कोल्हापूर येथे उपचार घेत असताना शनिवारी रात्री निधन झाले. शनिवारी सकाळी ६.१५ वा.सुमारास हा अपघात झाला होता. तेजस बांदेकर व त्याचा भाऊ तन्मय बांदेकर हे ज्युपीटर गाडीने देवगड पणजी ही गाडी थांबविण्यासाठी जामसंडे येथे गेले होते. जामसंडे येथील दिर्बादेवी स्टॉप समोर ज्युपीटर
गाडीला देवगड वानिवडे गाडीची धडक बसून झालेल्या भीषण
अपघातात दुचाकीस्वार तेजस तुषार बांदेकर(२५) व तन्मय तुषार बांदेकर (२०) रा.आनंदवाडीहे दोघेही भाऊ गंभीर जखमी झाले होते. दोघांनाही उपचारासाठी कोल्हापूर येथे हलविण्यात
आले आहे.देवगड वानिवडे या गाडीने ज्युपीटर गाडील धडक
दिल्यानंतर रस्त्यालगत असलेल्या दुकानाच्या पत्राशेडलाही धडक दिली यामुळे पत्राशेड तुटून ज्युपीटर गाडीवर पडल्याने
दोघांनाही गंभीर दुखापत झाली होती.यामध्ये तेजस याच्या
डोक्याला गंभीर दुखापत झाली होती.

या अपघातात दुचाकीवरील दोन्हीही युवकांना गंभीर दुखापत
झाल्याने उपचाराकरीता कोल्हापूर येथे नेण्यात आले
होते.तेजस याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती व अंतर्गत रक्तस्त्राव झाल्याने त्याची प्रकृती चिंताजनक होती. डॉक्टरांनी शनिवारी सायंकाळी शस्त्रक्रिया केली मात्र मेंदुला गंभीर दुखापत झाल्याने त्यांनी उपचाराला साथ दिली नाही व रात्री ११.३० वा.सुमारास उपचार सुरू असतानाच त्याचे निधन झाले. अपघातात जखमी असलेला त्याचा भाऊ तन्मय याच्यावरही कोल्हापूर येथे उपचार सुरू आहेत. तेजस याच्या वडीलांचे चार वर्षापुर्वी निधन झाले असून वडीलांच्या पश्चात आईने मासळी विक्री करून घर चालविले. मात्र सध्या आईचेही तब्येत चांगली नसल्याने तेजसने पातीने मच्छिमारी करण्याचा व्यवसाय सुरू केला होता. या व्यसायाच्या माध्यमातून तो घर चालवित होता. त्याचा अकाली निधनाने कुटुंबावर दुःखाचा कोसळला असून हळहळ व्यक्त होत आहे. रविवारी सकाळी ११.३० वाजता आनंदवाडीयेथे स्मशानभुमीमध्ये त्याचा पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

प्रतिक्रिया व्यक्त करा