You are currently viewing देवगड येथे आयोजित रक्तदान व नेत्रदान शिबिराला उस्फूर्त प्रतिसाद…

देवगड येथे आयोजित रक्तदान व नेत्रदान शिबिराला उस्फूर्त प्रतिसाद…

देवगड येथे आयोजित रक्तदान व नेत्रदान शिबिराला उस्फूर्त प्रतिसाद…

देवगड

येथे आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान आणि नेत्रदान शिबिराला उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी अनेक रुग्णांनी या शिबिराचा लाभ घेतला. विशेष म्हणजे यावेळी ५१ रक्तदात्यांनी रक्तदान केले. सर्कल देवगड आणि सिंधू रक्तमित्र शाखा देवगड यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान आणि नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आलेले होते. शिबिरांचे उद्घाटन डॉ. सुनील आठवले यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी जिल्हा रक्तपेढीचे डॉ. मनोज पवार व त्यांचे सहकारी सिंधू रक्तमित्र चे आणि फ्रेंड सर्कल मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.

या रक्तदान शिबिरामध्ये एकूण ५१ रक्तदात्यांनी रक्तदान केले. तसेच २५ व्यक्तींनी नेत्र तपासणीचा लाभ घेतला. यावेळी सिंधू रक्त मित्रचे उपाध्यक्ष व शेठ मग हायस्कूलचे चतुर्थ श्रेणी कर्मचारी श्री पंढरीनाथ आचरेकर यांचा त्यांनी आतापर्यंत ४५ वेळा रक्तदान केल्याबद्दल शाल श्रीफळ व गुलाबपुष्प देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या दोन्ही शिबिरास अतिशय उत्तम प्रतिसाद लाभला. शिबिर यशस्वी होण्यासाठी फ्रेंडस सर्कल आणि सिंधू रक्तमित्र शाखा देवगड या दोन्ही मंडळांच्या कार्यकर्त्यांनी विशेष मेहनत घेतली. यावेळी सिंधू रक्त मित्र तसेच जिल्हा रक्तपेढीमार्फत फ्रेंडस सर्कल मंडळाला त्यांनी केलेल्या या उपक्रमाबद्दल सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्रक देऊन गौरविण्यात आले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

20 − eleven =