You are currently viewing कामगार – खर्चीवाला यंञमागधारकांचा मजुरीवाढीचा एकञित प्रश्न सोडवणे गरजेचे : जाधव

कामगार – खर्चीवाला यंञमागधारकांचा मजुरीवाढीचा एकञित प्रश्न सोडवणे गरजेचे : जाधव

कामगार – खर्चीवाला यंञमागधारकांचा मजुरीवाढीचा एकञित प्रश्न सोडवणे गरजेचे : जाधव

इचलकरंजी : प्रतिनिधी
सध्या यंत्रमाग कामगार मजुरीवाढीचा प्रश्न सुरू आहे. गेली अनेक वर्षे हा उद्योग आर्थिक संकटातून व मंदीच्या दुष्टचक्रातून जात आहे. कामगारांना मजुरीवाढ मिळावी ही जरी रास्त भूमिका असली तरी खर्चीवाला यंत्रमागधारकांना ट्रेडिंग असोसिएशनकडून मजुरी वाढ मिळाल्याशिवाय हा प्रश्न सुटू शकणार नाही. तरी कामगार संघटना व यंत्रमागधारकांनी मजुरीवाढीचा
एकत्रित मूळ प्रश्न सोडवणे गरजेचे आहे. मात्र काही कामगार पुढारी कारखाने बंद ठेवा, सोडणार नाही अशी भाषा बोलत आहेत. त्यामुळे शहरातील औद्योगिक
वातावरण बिघडू शकते. याचे भान सर्वांनी ठेवणे गरजेचे आहे , असे मत खर्चीवाला यंत्रमानधारक संघटनेचे धर्मराज जाधव यांनी व्यक्त केले आहे.

सन 2013 साली तत्कालीन कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांच्यासमोर मजुरीवाढीचा करार झाला. हा करार गेली कित्येक वर्षे कारखानदारांनीच पाळला. त्यांना मजुरीवाढ मिळाली नाही. पण त्यांनी आपले भाऊ मानून कामगारांना मुजरीवाढ दिली. पण दिवसेंदिवस परिस्थिती हाताबाहेर गेली. मंदीची लाट आली , त्यामुळे अनेकांनी आपले यंत्रमाग भंगारात विकले. आज मालकच यंत्रमाग कामगार म्हणून दुसरीकडे पाळी करतात. ही सर्व वस्तूस्थिती लक्षात घेता खर्चीवाला यंत्रमागधारक संघटनेने गेल्या चार वर्षांपूर्वी मुश्रीफ करार आता आम्ही पाळू शकत नाही , असे कामगार आयुक्तांना निवेदनाद्वारे कळवले होते.तरी देखील कामगार संघटनांकडून आयुक्तांवर दबाव टाकून मजुरीवाढ जाहीर करून घेतली जाते . आता सर्व यंत्रमागधारक संघटनांनी संघटित होऊन खर्चीवाला यंत्रमागधारकांना मजुरी वाढ मिळवण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. अन्यथा उरला सुरला यंत्रमाग उद्योग पुन्हा भंगारात जाईल आणि मालकही बेकार व कामगारही बेकार , अशी परिस्थिती उद्भवू शकते.विशेष म्हणजे यंत्रमागधारक नेहमीच राजकारणाचा बळी ठरला आहे.
2013 साली तत्कालीन नेते मंडळींनी पुढील दहा वर्षांची मजुरी एकदमच वाढवून ठेवली , याचा फटका आता बसत आहे. तरी यंञमाग
मालक व कामगार दोन्ही जगले पाहिजेत , हा विचार डोळ्यासमोर ठेवून खासदार, आमदार, माजी आमदार यांनी ताबडतोब खर्चीवाल्या यंत्रमागधारकांच्या मजुरी वाढीसाठी बैठक बोलवावी. तसेच यातून खर्चीवाला यंत्रमागधारक व कामगारांचा प्रश्न सोडवून संभाव्य संघर्ष टाळावा ,असे आवाहन खर्चीवाला यंञमागधारक संघटनेचे धर्मराज जाधव यांनी केले आहे.
सध्याच्या महागाईच्या काळात यंत्रमाग कामगारांना जगणे अवघड झाले आहे. अशीच स्थिती छोट्या यंत्रमानधारकांची देखील झाली आहे. शहरातील पॉवरलूम असोसिएशन व सर्व यंञमागधारक
संघटनांनी कामगार संघटनांना सोबत घेतल्याशिवाय दोघांच्याही मजुरी वाढीचा तिढा सुटणार नाही. हे मात्र निश्चित आहे.त्यामुळे
दोन्ही संघटनानी कोणतीही व्देष भावना मनात न ठेवता शहरातील वस्त्रोद्योग व्यवसाय टिकवण्यासाठी
कामगार नेते माजी आमदार कॉम्रेड कै.के.एल. मलाबादे यांचा आदर्श घेऊन एकत्रित काम करावे ,अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे.

 

*संवाद मीडिया*

*🫘🫘 सुनंदाई कृषी उद्योग* 🫘🫘

*आमच्याकडे पारंपरिक पद्धतीने निर्मित नैसर्गिक गुणधर्म असलेले लाकडी घण्याचे १०० % शुद्ध व सात्विक खाद्यतेल मिळेल*

🥜 *आमची उत्पादने*🥜

*🔹 शेंगदाणा तेल🔹 खोबरे तेल*
*🔹 तीळ तेल🔹 करडई तेल*
*🔹 मोहरी तेल🔹 सूर्यफूल तेल*
*🔹 बदाम तेल🔹 अक्रोड तेल*
*🔹जवस(अळशी)तेल*
*🔹गीर गाईचे तुप🔹देशी गाईचे तूप*
*🔹गावठी मध*

🍒 *इतर कृषी उत्पादने* 🍒

*🔸 कोकम🔸कोकम सरबत (आगळ)*
*🔸 उकडा तांदूळ🔸तांदूळ पीठ*
*🔸 नाचणी🔸नाचणी पीठ*
*🔸 कुळीथ🔸कुळीथ पीठ*
*🔸 नैसर्गिक गूळ🔸गूळ पावडर*
*🔸 हळद🔸बेसन*
*🔸 मालवणी मसाला*
*🔸 इतर कृषी उत्पादने*

*टीप :तुम्ही स्वतःकडचे धान्य (तेल बिया) आणि सुखे खोबरे आणून दिल्यास त्वरित घाण्यातून शुद्ध तेल काढून दिले जाईल.*

*अधिक माहितीसाठी संपर्क*

*📱प्रमोद – 9869274319 / 9082926038*
*📱प्राची – 9869276909 / 8104214070*
*📱आदित्य : 9870455513*

*🌎 www.sunandaai.com*

*✉️ sunandaaikrushi@gmail.com*

*📍पत्ता : सुनंदाई कृषी उद्योग, तेरसे कंपाऊंड, गवळदेव मंदिर समोर, कुडाळ*

*जाहिरात लिंक*

———————————————-

प्रतिक्रिया व्यक्त करा