You are currently viewing ११ जुलै रोजी गझलकार मधुसूदन नानिवडेकर काव्य पुरस्कार – दुसरे वर्ष

११ जुलै रोजी गझलकार मधुसूदन नानिवडेकर काव्य पुरस्कार – दुसरे वर्ष

सिंधुवैभव साहित्य समूहाचा उपक्रम

 

तळेरे :

सुप्रसिद्ध गझलकार, पत्रकार व अखिल भारतीय गझल सम्मेलनाचे अध्यक्ष कै. मधुसूदन नानिवडेकर यांच्या द्वितीय स्मृतिदिनी २०२२ व मे २०२३ पर्यंत प्रकाशित झालेल्या मराठी काव्य संग्रहास पुरस्कार देण्यात येणार आहे. मानपत्र व रोख रक्कम पाच हजार रूपये असे याचे स्वरूप असून नानिवडेकर यांच्या स्मृतिदिनी ११ जुलै रोजी त्याचे प्रदान मान्यवर लोकांच्या उपस्थितीत ऑनलाईन केले जाईल. तरी इच्छुकांनी आपले काव्यसंग्रह खालील पत्त्यावर पाठवावे असे आवाहन सिंधुवैभव साहित्य समूहाच्या अध्यक्षा सौ स्नेहा राणे यांनी केले आहे.

*काव्यमुदत २० जून २०२३ PDF असेल तरी चालेल*

पत्ता – शैलेश घाडी, वेदांत सोनोग्राफी सेंटर, तेली आळी, कणकवली जि सिंधुदुर्ग. या पुरस्कारकरिता जिल्ह्यातील जास्तीत जास्त स्पर्धकांनी आपले साहित्य पाठवावे असे आवाहन करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा