You are currently viewing भटके विमुक्त हक्क परीषदेच्या रेट्यामुळे अखेर दोन आरोपी गजाआड

भटके विमुक्त हक्क परीषदेच्या रेट्यामुळे अखेर दोन आरोपी गजाआड

तळेरे:- प्रतिनिधी

धुळे जिल्ह्यातील साक्री घटनेतील स्व.मोहिनी ताई जाधव हिला न्याय मिळवून देण्यासाठी भटके-विमुक्त हक्क परीषद महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष श प्रा. धनंजय ओंबासे यांच्या नेतृत्वाखाली व गोंधळी समाज योद्धा संजय मारुती कदम आणि इतर संघटनेचे समाज बांधवांनी एकत्रीत येवून सातत्याने अनेक दिवस आंदोलने केली तसेच भटके-विमुक्त हक्क परीषद सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष शशिकांत इंगळे यांनी थेट गृहराज्य मंत्री दिलीप वळसेपाटील यांच्याशी संपर्क करीत दोषी गुन्हेगारांवर कारवाई करण्याची मागणी केली होती तसेच दि.26 जानेवारी रोजी जगताप कुटुंबियांनी आत्मदहन देखील करण्याचे प्रयत्न केल्याने अखेर प्रशासनाला न्याय द्यावाच लागला एकूण नऊ व्यक्तिवर 302 सारखा गंभीर गुन्हा दाखल झाला असून आतापर्यंत दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे तर सात आरोपी अजूनही फरार आहेत ,त्यामुळे पुढील तपास एल.सी.बी.ची टीम करीत आहे येत्या पाच सहा दिवसात सर्व आरोपींना पकडण्यात यश येईल असे समाजाला प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे तरीही आमचं आंदोलन हे सुरूच राहणार असून जर लवकरात लवकर आरोपींना अटक झाली नाही तर प्रत्येक जिल्ह्यातून थेट जिल्हाधिकारी कार्यालयावर सर्व समाज बांधवांच्या वतीने आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे असा इशारा भटके-विमुक्त हक्क परीषद सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष शशिकांत इंगळे यांनी प्रसिद्ध पत्रकात म्हटले आहे.

 

प्रतिक्रिया व्यक्त करा