You are currently viewing गोवर सदृश्य रुग्ण आढळल्याने सतर्क रहा – सरपंच प्रियांका नाईक

गोवर सदृश्य रुग्ण आढळल्याने सतर्क रहा – सरपंच प्रियांका नाईक

बांदा

बांदा शहरात आळवाडी येथे ५ बालकांना गोवर सदृश लक्षणे आढळल्याने आज सरपंच प्रियांका नाईक, उपसरपंच जावेद खतीब यांनी बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी डॉ. मयुरेश पटवर्धन यांची भेट घेत माहिती घेतली. यावेळी सरपंच श्रीमती नाईक यांनी आरोग्य विभागाला सर्वेक्षण करण्याबाबत तसेच सतर्क राहण्याबाबत सूचना केल्यात.

शहरातील आळवाडी येथील मैदानात सोलापूर जिल्ह्यातील परप्रांतीय मजुरानी वस्ती केली असून या वस्तीतील ५ बालकांमध्ये गोवरची लक्षणे आढळल्याने एकच खळबळ उडाली होती. या पार्श्वभूमीवर सरपंच नाईक, उपसरपंच खतीब यांच्याशी शैलेश केसरकर, विराज परब, शैलेश गवस, प्रवीण परब यांनी डॉ. पटवर्धन यांची भेट घेत त्यांना सूचना दिल्यात. यावेळी डॉ. पटवर्धन यांनी संशयित सर्व रुग्णांची प्रकृती उत्तम असून आरोग्य विभागाने आळवाडी परिसरातील ७९ जणांचे आरोग्य सर्वेक्षण केल्याची माहिती दिली. मात्र अन्य कोणीही रुग्ण आढळले नसल्याचे सांगितले.
यानंतर सरपंच नाईक, उपसरपंच खतीब यांनी बांदा पोलीस निरीक्षक शामराव काळे यांची भेट घेत शहरात बेकायदा राहत असलेल्या परप्रांतीय कामगारांना शहरातून बाहेर घालविण्याची मागणी केली. या कामगारांमुळे नाहक शहरातील जनतेच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्याने तात्काळ कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. पोलीस निरीक्षक काळे यांनी याबाबत तात्काळ कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

2 × one =