You are currently viewing गाभुळल्या सांजेस

गाभुळल्या सांजेस

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्माननीय सदस्य लेखक मधुसूदन पतकी लिखित अप्रतिम लेख*

*गाभुळल्या सांजेस..*

सस्नेह नमस्कार..!
दिवस सुंदर जावा ,अगदी प्रत्येक दिवस सुंदर जावा असं प्रत्येकालाच वाटतं. ते खरंही आहे. दिवस सुरु होताना मंजुळ आवाज, सुगंध, सु-दर्शन व्हावं असं प्रत्येकालाच वाटतं. आजच्या परिस्थितित चांगलं वाचायला मिळावं आणि त्याचा दिवसभर चांगला परिणाम राहावा असंही वाटतं. सकाळी चांगलं वाचलं ऐकलं की त्याचा परिणाम दिवसभर राहतो ,असं मला काही जणांनी सांगितल.आणि ते खरं ही आहे. आपल्याला त्याचा अनुभवही असतो.सकाळी कानावर जे गाणं पहिल्यांदा ऐकू येत, ते दिवसभर मनात राहतं.तसच वाचनाचं! गेले कित्येक दिवस मी सकाळी लिहीत होतो .अनेकजण वाचायचे. काहीजण प्रतिक्रिया द्यायचे .आनंद व्हायचा. आपण जे लिहितो, ते कोणालातरी आवडतं आणि त्याचा दिवसभर मनावर चांगला परिणाम होतो याचं नक्कीच मला समाधान होतं .आता ठरवतोय सकाळ ऐवजी संध्याकाळी लिहावं. दिवस चांगला जातो हे तर सकाळच्या लेखनावरून मला समजलं. आता संध्याकाळ सुंदर जावी असं मला वाटायला लागलं.संध्याकाळ..! खरं तर या वेळेला खूप कंगोरे आहेत.मला सकाळ,पहाट आवडते. प्रसन्न;नव्याने जगण्याच्या ऊर्जेचा प्रारंभबिंदू म्हणून. पण संध्याकाळचं मला आत्यंतिक आकर्षण आहे .ओढ आहे. कारण मला संध्याकाळ नेहमी गाभुळलेली वाटते. पक्व.दिवसभराच्या अनेक अनुभव, विचार, कृतीतून साखरेचा पाक कसा होतो किंवा चिंच जशी गाभुळते तशीही वेळ असते. ना दिवस ,न रात्र. ना तारुण्यं ना वृद्धापकाळ. ना झोप ,ना पुर्ण जाग. ना कंटाळा ना उत्साह. ही वेळ म्हणजे आळसाची एक तंद्रावस्था. बरचं काही केलंय. थोडा थकलोय .आणि पुन्हा उत्साहानी आणि काही करायचंय याच्या मधला काळ. थोडा सिंहावलोकानाचा आणि थोडा पुढच्या नियोजनाची.
ही संध्याकाळ म्हणजे बस एक कप कडक चहा.एक मस्त सुगंधी उदबत्ती. किंवा धूप .जगजित ,गुलामअली यांची गझल . वा कुमारजी, किशोरीजींच्या भजनाची मुलायम, रेशमी सुरावट. त्या सुरावटीत भावविभोर आपण. उत्साहाचा हळूहळू पुन्हा होत जाणारा संचय .दिवसभर फुललेली गंध देणारे फुलं ,पाकळ्या मिटतात .अनेक झाडांची पानं विश्रांती घ्यायला लागतात आणि अशा या मिटलेल्या पाना, फुलांमध्येही एक नैसर्गिक सौंदर्य दिसायला लागतं. पाखरं घरट्यात . अन् पिल्लं दडतात घरट्यात,पाखरांच्या उबेत . बऱ्याच काळानी एकमेकाकांना भेटलेल्याचा आनंद ,उत्साह संध्याकाळी पाहायला मिळतो .सकाळी खरं तर त्यांची पाखरांची निरोपाची वेळ .मन:स्थितीच्या दृष्टीने थोडी उदास. ही उदासी ज्या पिलांचे आई-वडील; दाणापाणी हुडकण्यासाठी,आणण्यासाठी घराबाहेर पडतात त्यांना तर जास्त जाणवणारी.ही सकाळची वेळ प्रसन्न पण मन ओलावलेलं असतं. या उलट संध्याकाळी वेळ ! दिवस संपण्याची थकलेली. मात्र मनोवृत्ती त्या पाखरांच्या आनंदाची. म्हणून संध्याकाळ विविधरंगी. पोताची. तिथे धागे वेगवेगळ्या रंगात रंगून येतात. कधी कोलाज तर कधी कॅलिडोस्कोप होऊन. हे आकार होतात, दिसतात भावनांचे, आठवणींचे .यावेळी विसरावं ते हमखास आठवतं आणि आठवावं ते नक्की विसरलं जातं . तर अशी ही संध्याकाळ . ही वेळ रातराणीसारखी कधी दरवळणारी. तर कधी मिटल्या पाकळ्या किंवा गंधा सारखी शांतावत जाणारी. पण तरीही खूप आकर्षक .हवीहवीशी. बहुरंगी .पक्व . फक्त नि फक्त चिमटीतच मावणारी .
🙏
स्नेहांकित
मधुसूदन पतकी

👩‍💻🧑‍💻👩‍💻👨‍💻👩‍💻👨‍💻👩‍💻👨‍💻🧑‍💻

*_प्रवेश सुरू.. प्रवेश सुरू… प्रवेश सुरू….._*🏃‍♀️🏃‍♂️

*स्पर्धा परीक्षांमध्ये करिअर करायची सुवर्णसंधी*

*⚜️महेंद्रा ॲकॅडमी⚜️*

*🔰स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र🔰, सावंतवाडी*

*_🌎सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी चालू केलेली एक विशेष चळवळ_*

*_♻️सिंधुदुर्ग जिल्हा हा 10 वी 12वी च्या परीक्षांच्या निकालाचा विचार करता अग्रेसर जिल्हा म्हणून ओळखला जातो. पण नंतर ही मुले कुठल्याही स्पर्धा परीक्षांमध्ये का दिसत नाहीत? स्पर्धापरीक्षांमध्ये आपला जिल्हा मागे का पडलाय? या सर्व प्रश्नांची उत्तरे घेऊन आले आहे ? महेंद्रा अकॅडमी सावंतवाडी._*
*_♻️आगामी काळात सिंधुदुर्ग जिल्हा हा अधिका-यांचा जिल्हा म्हणून नावारुपाला येईल याचे सर्वतोपरी प्रयत्न महेंद्रा अकॅडमी तर्फे केले जातील._*

*🔰⚜️आमच्याकडे उपलब्ध कोर्सेस🔰⚜️👇🏻*

*1. 🔰राज्यसेवा , संयुक्त परीक्षा गट – ब ( PSI /STI/ASO) CDPO( महिला व बालविकास अधिकारी) व सर्व प्रकारच्या सरळ सेवा भरती*

*2.🔰पोलीस भरती स्पेशल बॅच – 2023*

*3.🔰 सर्व प्रकारच्या बँकिंग परीक्षा स्पेशल बॅच -2023*

🎉🎊🎊 *( नवीन बॅचेससाठी प्रवेश प्रक्रिया सुरू आहे)🎉🎊🎊*

*🔰आमच्या अकॅडमीची वैशिष्ट्ये🔰*-:

*📌अनुभवी शिक्षकवर्ग.*
*📌सुसज्ज वाचनालय.📚📚*
*📌अभ्यासाला पुरक आणि शांत वातावरण.*
*🏠निट व स्वच्छ वर्ग.*
*📌पिण्याचा पाण्याची सोय.*
*📌वाचनालयामध्ये प्रवेश घेण्याअगोदर वाचनालय बघायची संधी.*
*📌आकर्षक व उपयोगी पुस्तके वाचनालयामध्ये उपलब्ध.*
*📌अनोखी शिकवण्याची पद्धत*

*_👉आमच्या अकॅडमीला एकदा भेट द्या आणि आपल्याला पडलेल्या स्पर्धा परीक्षांच्या प्रश्नांची उत्तरे मिळवा._*
*_”मित्रहो” महेंद्रा अकॅडमी ही आपल्या जिल्ह्यातील तरुणांमध्ये असलेली उदात्त बुद्धिमत्ता तसेच आपल्या जिल्ह्यातील मुलांमध्ये अभ्यास करण्याची असलेली क्षमता ही संपूर्ण जगाला दाखवून देण्यासाठी चालू केलेली विशेष चळवळ आहे.आपल्या बहुमूल्य वेळेपैकी थोडा वेळ आमच्यासाठी काढा आणि आमच्या अकॅडमीला एकदा नक्की भेट द्या._*

*अधिक माहितीसाठी संपर्क करा*

*📲7350219093*
*📲9022686944*

*जाहिरात लिंक*

———————————————-

 

प्रतिक्रिया व्यक्त करा

13 − two =