You are currently viewing देशभक्त बाबासाहेब खंजिरे जन्मशताब्दी निमित्त कबड्डी स्पर्धेस प्रारंभ

देशभक्त बाबासाहेब खंजिरे जन्मशताब्दी निमित्त कबड्डी स्पर्धेस प्रारंभ

इचलकरंजी: प्रतिनिधी

देशभक्त बाबासाहेब खंजिरे यांच्या जन्मशताब्दी निमित्त येथील जयहिंद क्रीडा मंडळाच्या क्रीडांगणावर आयोजित कबड्डी स्पर्धेस विविध मान्यवरांच्या उपस्थितीत प्रारंभ करण्यात आला.

स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी बोलताना खासदार धैर्यशील माने यांनी इचलकरंजीच्या क्रीडा परंपरेचा पूर्ण जिल्ह्याला अभिमान असून दिवंगत खेळाडूंच्या स्मृती जपण्यासाठी स्पर्धा महत्त्वाच्या आहेत. त्याचबरोबर सर्व खेळाडूंच्या स्मृती जपण्यासाठी खेळाडूंच्या स्मृतीसंग्रहालयाची उभारणी केली पाहिजे , असे प्रतिपादन केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष आमदार प्रकाश आवाडे यांनी इचलकरंजीच्या कामगारांसाठी इंटक उभारणीमध्ये स्वर्गीय देशभक्त बाबासाहेब खंजिरे यांचा मोलाचा वाटा आहे. देशभक्त बाबासाहेब खंजिरे हे करारी आणि ध्येयवादी नेते होतेच पण तितकेच गुणवंत खेळाडूही होते. इचलकरंजीतील क्रीडा मंडळांच्या उभारणीत त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिल्याचे गौरवोद्गार देखील त्यांनी काढले.
कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक करताना कार्याध्यक्ष राहुल खंजिरे यांनी देशभक्त बाबासाहेब खंजिरे जन्मशताब्दी निमित्त आयोजित विविध क्रीडा स्पर्धांच्या माध्यमातून युवकांमध्ये क्रिडाविषयी जागृती होऊन मैदानात विविध खेळांना प्रोत्साहन देणे हा उद्देश असल्याचे सांगितले.
यावेळी 70 किलो वजनी गटाखालील पुरुषांच्या कबड्डी स्पर्धेत उद्घाटन सामना छावा शिरोली व महालक्ष्मी कुपवाड यांच्यात खेळवण्यात आला. या सामन्यात अनुभवी छावा शिरोलीच्या संघाने सुरुवातीपासून वर्चस्व राखत दोन्ही डावामध्ये आघाडी घेत 29 विरुद्ध 7 अशा तब्बल 22 गुणांच्या फरकाने सामना जिंकला. उद्घाटनाचा दुसरा सामना शिवामुद्रा कौलव विरुद्ध बालशिवाजी शिरोळ यांच्या दरम्यान खेळविण्यात आला. मध्यंतरपर्यंत दोन्ही संघांनी अतिशय चुरशीने खेळ दाखवीत प्रेक्षकांची मने जिंकली मात्र उत्तरार्धात मात्र शिवमुद्रा कौलवच्या खेळाडूंनी आक्रमक चढाया व अभेद्य क्षेत्ररक्षणाच्या बळावर सामना 34 विरुद्ध 24 असा 10 गुणांच्या फरकाने जिंकला.व्यासपीठावर
माजी आमदार राजीव आवळे, शिवसेना जिल्हाध्यक्ष रवींद्र माने, अशोकराव स्वामी, रणजित कदम, गंगाराम जाधव, प्रकाश दत्तवाडे, संभाजीराव पाटील, संजय कल्याणकर, संजय कांबळे, बाबासाहेब कलागते, महादेव कांबळे, सतिशभाऊ डाळ्या, अरुणराव खंजिरे, शामराव कुलकर्णी, सदा मलाबादे, उदय चव्हाण यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. सदर सामने कोल्हापूर व सांगली जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने जयहिंद मंडळाच्या वतीने घेण्यात येत असून दिनांक 15 व 16 रोजी दिवसरात्र प्रकाशझोतात खेळवण्यात येणार आहेत. स्पर्धेत सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील नामांकित 18 संघांना निमंत्रित करण्यात आले आहे.

🎋🎋🌾🌾🌴🌴🌱🌱🎋🎋🌾

*_शेतकरी, कष्टकरी बांधवांसाठी एक छोटीशी मदत_*

*_🥭🌴आंबा, नारळ, सुपारी,आणि काजू साठी अत्यंत गरजेची असणारी उत्पादने_*

*🎋🌴🌾 Maharashtra agro fertilizer and chemicals* 🎋🌴🌾
*kolhapur*

*_👉डायरेक्ट फॅक्टरी दरांमध्ये, उपलब्ध._*
*_👉मधल्या कुठल्याच मेडीयटरचा समावेश नसल्यामुळे कमी दरांमध्ये अतिशय उत्कृष्ट पद्धतीचे सेंद्रीय खत उपलब्ध_*
*_👉 कल्पवृक्ष आणि निंबोळी पावडर संतुलन ऑर्डर नुसार पोहच करण्याची व्यवस्था_*

*🔹जमिनीच्या सुपीकते बरोबरच उत्पन्नात देखील भरघोस वाढ*

*🔸पिकांची उत्तम वाढ*
*🔹 रोग प्रतिकारक शक्ती वाढते*
*🔸जमिनीचा सामू समान ठेवण्यास मदत*
*🔹 पानांचा व फळांचा आकार वाढतो*
*🔸फळे मोठी होणे*
*🔹प्रकाश संश्र्लेशन कार्य वाढवते.*
*🔸निरोगी आणि विषमुक्त पिके*

*👉आजच संपर्क करा*

*Maharashta agro fertilizer and chemicals.kolhapur.*

*📲9823857786*
*📲8208657954*

*Advt web link 👇*

———————————————-

प्रतिक्रिया व्यक्त करा