You are currently viewing कट्टा येथे प्रा. मधु दंडवते यांची जयंती साजरी बॅ. नाथ पै सेवांगण कट्टा शाखेत कार्यक्रमाचे आयोजन

कट्टा येथे प्रा. मधु दंडवते यांची जयंती साजरी बॅ. नाथ पै सेवांगण कट्टा शाखेत कार्यक्रमाचे आयोजन

मालवण

कोकण रेल्वेचे शिल्पकार व राजापूर मतदार संघाचे पाच वेळा लोकसभेत प्रतिनिधीत्व केलेले खासदार प्रा. मधु दंडवते यांची ९८ वी जयंती बॅ. नाथ पै सेवांगण कट्टा शाखेत साजरी करण्यात आली.

या वेळी ऑनलाईन प्रश्नमंच स्पर्धेत बक्षिस पात्र ठरलेल्या अर्चना धुत्रे व साक्षी देसाई याना साधना प्रकाशनची पुस्तके देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी किशोर शिरोडकर दीपक भोगटे, बापू तळावडेकर, अर्चना धुत्रे, साक्षी देसाई, श्रीधर गोंधळी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

13 − eight =