You are currently viewing छत्रपती संभाजी राजे संपूर्ण देशाचे आदर्श – श्रीकांत सावंत.

छत्रपती संभाजी राजे संपूर्ण देशाचे आदर्श – श्रीकांत सावंत.

मालवण :

 

छत्रपती संभाजी राजे संपूर्ण देशाचे आदर्श आहेत. संभाजी राजे यांचे कार्य, कर्तुत्व, युद्ध निती, बुध्दी अतिशय अफाट होती. आज संभाजी राजे यांचा इतिहास नव्या पिढीला समजाऊन सांगणे काळाची गरज आहे. संभाजी राजे खऱ्या अर्थाने धर्मवीर होते आणि ते मराठ्यांचे राजे होते हे आम्हा सर्वांसाठी भूषण असे आहे असे प्रतिपादन मानवता विकास परिषद अध्यक्ष श्रीकांत सावंत यांनी मालवण भरड येथील लीलांजली सभागृहात बोलताना केले.

मालवण येथे धर्मवीर संभाजी महाराज यांची जयंती महाराष्ट्र मधील एक अग्रगण्य संस्था मानवता विकास परिषद च्या वतीने साजरी करण्यात आली. प्रथम छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेला नायब तहसीलदार आनंद मालवणकर आणि श्रीकांत सावंत यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी धर्मवीर संभाजीराजे यांच्या कार्यकर्तृत्वाचा गौरव करणाऱ्या घोषणा उपस्थिततांमधून करण्यात आल्या. या वेळी सामाजिक कार्यकर्ते नामदेव मठकर, आनंद मालवणकर, मानवता विकास परिषद चे अध्यक्ष श्रीकांत सावंत, ज्येष्ठ वकील समीर गवाणकर, सामाजिक कार्यकर्ते मारुती सोनवडेकर,संतोष नागवेकर, बिळवस सरपंच मानसी पालव,आशिष खोत,दत्तप्रसाद पेडणेकर आणि मानवता विकास परिषद चे कार्यकर्ते उपस्थित होते.

या वेळी ज्येष्ठ वकील समीर गवाणकर यांनी छत्रपती संभाजी राजे यांचा इतिहास ओघावत्या शैलीत सभागृहात सादर करून मानवता विकास परिषदेच्या आजच्या या अनोख्या उपक्रमाबद्दल कौतुक केले.

यावेळी अध्यक्ष स्थानावरून बोलताना आनंद मालवणकर म्हणाले मानवता विकास परिषद च्या वतीने आज संभाजी महाराज यांची जयंती मालवण मध्ये साजरी करताना संभाजी राजेंचा इतिहास खऱ्या अर्थाने आज जागवता आला यापुढेही आपण सर्वांनी संभाजी राजे यांच्या विचारांचे पालन करून मार्गक्रमण करणे जरुरीचे आहे असे सांगितले. उपस्थित मान्यवरांनी यावेळी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार दत्तप्रसाद पेडणेकर यांनी मानले उपस्थित सर्व मान्यवरांचे मानवता विकास परिषद चे अध्यक्ष श्रीकांत सावंत यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत आणि सत्कार केला यावेळी मालवण तालुका विकासात्मक गोष्टींबाबत चर्चा विनिमय करण्यात आली.

प्रतिक्रिया व्यक्त करा

five − two =