You are currently viewing पालकमंत्री उदय सामंत यांचा सिंधुदुर्ग दौरा…

पालकमंत्री उदय सामंत यांचा सिंधुदुर्ग दौरा…

सिंधुदुर्गनगरी

उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत हे १७ जानेवारी २०२१ ला सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे आहे.
रविवार १७ जानेवारी २०२१ ला सकाळी ८:३० वा. एम.आय.डी.सी. विश्रामगृह, कुडाळ येथे आगमन व राखीव, ९:३० वा. कुडाळ येथून मोटारीने ग्रामिण रुग्णालय, वेंगुर्लाकडे प्रयाण, १०:१५ वा. हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती दिनानिमित्त शिवसेना वेंगुर्ला तालुका व अथायु मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने, ग्रामिण रुग्णालय, वेंगुर्ला येथे आयोजित मोफत महा आरोग्य तपासणी शिबीरास भेट, १०४५ वा. वेंगुर्ला शाळा नं. १ येथे बॅरिस्टर नाथ पै यांच्या ५० व्या पुण्यतिथी निमित्त त्यांच्या जीवनावर अधारित पुस्तक प्रकाशन सोहळ्यास उपस्थिती, दुपारी १२:१५ वा. वेंगुर्ला येथून मोटारीने चिपी विमानतळाकडे प्रयाण, १:०० वा. चिपी विमानतळ येथे आगमन, पाहणी व जिल्हाधिकारी, मुख्य अभियंता एम.आय.डी.सी., कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम, कार्यकारी अभियंता एम.एस.ई.बी. कार्यकारी अभियंता एम.आय.डी.सी., विमानतळ विकासक प्रतिनिधी व संबंधित अधिकारी यांच्या समवेत बैठक, दुपारी २:०० वा. चिपी विमानतळ येथून मोटारीने कुडाळकडे प्रयाण, दुपारी २:३० वा. शिवसेना शाखा कुडाळ येथे युवासेनेच्या वडापाव सेंटर उद्घाटन कार्यक्रमास उपस्थिती, दुपारी ३:३० वा. एम.आय.डी.सी. विश्रामगृह कुडाळ येथे राखीव, सायं. ५:०० वा. सिंधुदुर्गनगरी, ओरोस येथे दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर स्मारक व पत्रकार भवनला सदिच्छा भेट. सायं. ५:३० वा. सिंधुदुर्गनगरी ओरोस येथून मोटारीने रत्नागिरीकडे प्रयाण.

प्रतिक्रिया व्यक्त करा

one × 3 =