You are currently viewing पाटेकर कला व क्रीडा मंडळ साळगाव व समस्त भंडारी बांधवांकडून जय भंडारी चषक २०२४ चे आयोजन

पाटेकर कला व क्रीडा मंडळ साळगाव व समस्त भंडारी बांधवांकडून जय भंडारी चषक २०२४ चे आयोजन

*स्पर्धेचे वैशिष्ट्य म्हणजे विजेत्यांना बकरे आणि कोंबड्या मिळणार बक्षिसे*

 

कुडाळ :

साळगाव तालुका कुडाळ येथे जय भंडारी चषक 2024 चे आयोजन करण्यात आलेले असून ही स्पर्धा पाटेकर कला व क्रीडा मंडळ साळगाव व समस्त भंडारी बांधवांकडून आयोजित केली गेली आहे. या स्पर्धेतील विजेत्यांना रोख केवळ रकमा न देता आगळीवेगळी कल्पना राबवून वस्तुरुप बक्षिसे देण्यात येणार आहेत. यात बकरे, कोंबडे, उकडलेली अंडी, जय भंडारी लोगो असलेली खास टि शर्ट, पेज आदींचा समावेश आहे.

जय भंडारी चषक २०२४ या स्पर्धेसाठी प्रथम क्रमांकास श्री वैभव हळदणकर पुरस्कृत मोठा बकरा व श्री.योगेश केरकर पुरस्कृत रोख ५०००/- रुपये व श्री.गोविंद साटेलकर यांजकडून आकर्षक भेटवस्तू त्याचप्रमाणे द्वितीय क्रमांकास श्री.समीर हळदणकर पुरस्कृत छोटा बकरा व श्री.योगेश केरकर पुरस्कृत ३०००/- रोख बक्षीस आणि श्री.श्रीधर पेडणेकर यांजकडून आकर्षक बक्षिसे, तृतीय आणि चतुर्थ पारितोषिक श्री.बंड्या मांजरेकर पुरस्कृत दोन दोन मोठे गावठी कोंबडे ठेवण्यात आले आहेत. मालिकावीर करिता श्री श्रीकांत भगत पुरस्कृत सीलिंग फॅन, सामनावीर, उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, क्षेत्ररक्षक, यष्टिरक्षक आदींना दर्शन कुबल व अनुप नाईक पुरस्कृत बक्षिसे देण्यात येणार आहेत. त्याचप्रमाणे उपांत्य व अंतिम सामन्यात प्रत्येक षटकारासाठी अर्धा डझन उकडलेली अंडी आणि खेळाडूंना सामन्यादरम्यान शेखर व उदय हळदणकर पुरस्कृत गावठी तांदळाची पेज, दुसऱ्या फेरीनंतर सामनावीर साठी श्री.रूपेश पावसकर, श्रीम.श्रेया गवंडे श्री.अतुल बंगे पुरस्कृत जय भंडारी लोगो असलेली टी शर्ट देण्यात येणार आहेत.

ही आगळीवेगळी बक्षिसे असलेली स्पर्धा दिनांक २९/३०/३१ दरम्यान दाभाड मैदान, साळगाव तिठ्या नाजिक, हळदणकर वाडी येथे सुरू असून स्पर्धेसाठी गजा हळदणकर ९९७५९४३८६१/ नितीन गोलतकर ९४२१२६१२६१/ गोपाळ हळदणकर ९०४९३६५०११/ शेखर हळदणकर ९१५८८४९४७६ यांच्याशी संपर्क साधावा.

प्रतिक्रिया व्यक्त करा