You are currently viewing नागरिकांना आता आरटीपीसीआर रीपोर्ट पाहता येणार एका क्लिकवर

नागरिकांना आता आरटीपीसीआर रीपोर्ट पाहता येणार एका क्लिकवर

“वी फाॅर यू” संस्थेने बनविली नवीन वेबसाइट;

संस्थेचे अध्यक्ष ॲड. संकेत नेवगी यांनी दिली माहिती

सावंतवाडी

नागरिकांना आता आरटीपीसीआर रीपोर्ट “वी फाॅर यू” संस्थेतर्फे बनविण्यात आलेल्या वेबसाइट द्वारे एका क्लिकद्वारे पाहता येणार आहे. या प्रणालीची निर्मिती “वी फाॅर यू” संस्थेचे आय टी हेड देवेंद्र हळदणकर यांनी केली असून ही प्रणाली प्रशासनाकडे विनामोबदला सुपूर्द करण्यात आली. जिल्हाधिकारी श्रीम.के मंजूलक्ष्मी, जि.प.सी.ई.ओ. श्री प्रजित नायर यांच्या मार्गदर्शनाखाली ही प्रणाली विकसित करण्यात आली, अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष ॲड. संकेत नेवगी यांनी दिली.

आरटीपीसीआर टेस्ट केल्यानंतर रिपोर्ट पाहणे नागरिकांसाठी गैरसोयीचे होत होते व रीपोर्ट मिळण्यासाठी विलंब देखील होत होता. ही गैरसोय पाहता “वी फाॅर यू” या संस्थेने ही वेबसाईट बनविली आहे. ही प्रणाली ३१ मे २०२१ पासून कार्यान्वित झाली असून ३१ मे नंतर आरटीपीसीआर टेस्ट केलेल्या सर्व नागरिकांना आपला रिझल्ट या वेबसाईटवर पाहता येणार आहे व यामुळे नागरिकांची मोठ्या प्रमाणात होणारी गैरसोय थांबणार आहे.

प्रत्येक रुग्णाला या संदर्भात माहिती एस. एम.एस द्वारे पाठविली जाते. याचा प्रत्यक्ष वापरही जिल्हा प्रशासनाने चालू केला आहे.यासाठी https://reportsindhudurg.com या संकेतस्थळावर तो उपलब्ध होणार आहे. “वी फाॅर यू” संस्था अजून एका उपक्रमावर काम करत असून यासाठी स्वयंसेवकांची आवश्यकता आहे, इच्छुकांनी संपर्क साधावा असे आवाहन ‘”वी फाॅर यू” संस्थेचे अध्यक्ष ॲड. संकेत नेवगी यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा