You are currently viewing मे. श्री लक्ष्मण क्लासेसचे उद्घाटन संपन्न

मे. श्री लक्ष्मण क्लासेसचे उद्घाटन संपन्न

महिलांसाठी विविध क्लासेसचे आयोजन

सावंतवाडी

मे. श्री लक्ष्मण क्लासेस आणि सभागृह याचे उद्‌घाटन इनरव्हिल, क्लबच्या अध्यक्षा मा. दर्शना रासम मॅडम यांच्या हस्ते दि. ८ जाने 2023 रोजी
करण्यात आले. तसेच क्लासेच्या लोगोचे उद्‌घाटन कथ्यक आणि भरतनाट्यम् विशारद मा. कविता राऊळ यांच्या हस्ते करण्यात आले. दिपप्रज्वलन माजी नगरसेविका उत्कर्षा सोसोलकर व माजी भाजप अध्यक्ष श्री संजू शिरोडकर यांच्या हस्ते झाले मे.श्री. लक्ष्मण क्लासेस मध्ये रांगोळी मेहंदी, डान्स व झुम्बा क्लास घेण्यात येणार आहेत.
रांगोळी व मेहंदी – सलाउद्दीन तहसिलदार
डान्स – विशाल पवार
झुम्बा – शिवाजी तुवेकर
हे प्रशिक्षक नेमण्यात आले असल्याचे संचालिका – मीना क्रिएशनच्या प्रोप्रायटर मीना गावडे यांनी उद्घाटनावेळी जाहीर केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

2 × two =