You are currently viewing सैन्य भरती मार्गदर्शन शिबीर २६ जानेवारीला

सैन्य भरती मार्गदर्शन शिबीर २६ जानेवारीला

वर्दे :

आर्मीमध्ये सिंधुदुर्ग जिल्हात मुलांचा समावेश असावा व जास्तीत जास्त मुलांनी भरती व्हावे यासाठी सिग्मा करिअर ॲकेडमी नेहमीच प्रयत्न करीत असते. ५ ते 24 मार्च रोजी होणाऱ्या आर्मी भरतीत जास्तीत जास्त प्रमाणात उमेदवार भरती व्हावेत, भरती बाबतीत काही अडचणी दूर करण्यासाठी व  मार्गदर्शन व्हावे यासाठी सिग्मा करिअर ॲकेडमी २६ जानेवारीला ठीक सकाळी 10 वाजता सैन्य भरती ममार्गदर्शन शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबीर पूर्णतः मोफत असणार आहे व हे शिबीर वर्दे या गावात होणार आहे. मार्गदर्शक म्हणून भारतीय सैन्य दलात सेवेत असलेले संजय सावंत sub – (AIG) AAD -Indian Army उपस्थित राहणार आहेत. शिबिरामध्ये आर्मी भरतीसाठी आवश्यक असणारी कागद पत्रे तपासनी, रॅली भरतीसाठी टिप्स, सोबत आर्मी रॅलीसाठी आता महत्त्वच म्हणजेच कोविड निगेटिव्ह सर्टिफिकेट नोंदणी, रनिंगसाठी खास टिप्स, भरतीपूर्व मेडिकल चेकअप, डेन्टल चेकअप, कान, नाक, डोळे तपासनी करण्याची देखील सुविधा २६ जानेवारीला उपलब्ध केली जाणार आहे. जास्तीत जास्त उमेदवार कडून या शिबीरात सहभागी व्हावे. अधिक माहितीसाठी एस.जी.ठाकूर (९८५०८४५०९४) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

1 × 2 =