You are currently viewing ९ जून छत्रपती शाहू महाराज युवा शक्ती करिअर शिबिरानिमित्ताने….

९ जून छत्रपती शाहू महाराज युवा शक्ती करिअर शिबिरानिमित्ताने….

*९ जून छत्रपती शाहू महाराज युवा शक्ती करिअर शिबिरानिमित्ताने…..*
==============
*दहावी व बारावी नंतर पुढे काय…….?*
==============
मंगळवार दि.९ मे रोजी सकाळी १० वाजता अमरावतीच्या श्री संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन मध्ये महाराष्ट्र शासनाच्या पुढाकाराने रोजगार मिळावा करियर गायडन्स मेळावा दहावी बारावीनंतर काय करायचे..? उद्योजक कसे व्हायचे…?नाविन्यपूर्ण क्षेत्र कसे निवडायचे..? याबाबत मार्गदर्शन शिबिर संपन्न होत आहे. मी सध्या पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहे .माझ्या वतीने माझे सहकारी व मिशन आयएएसचे सहसंचालक उपप्राचार्य प्रवीण खांडवे हे व इतर तज्ज्ञ या व्यवसाय मार्गदर्शन शिबिराला मार्गदर्शन करणार आहेत.
खरं म्हणजे हे असे उपक्रम नियमितपणे राबवायला पाहिजेत. आम्ही अशा उपक्रमाची सुरुवात २३ वर्षांपूर्वी केली आणि स्थळ निवडले ते संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवनच. मिशन आयएएसचे एवढे कार्यक्रम संस्कृतिक भवनांमध्ये झाले तेवढे कुठल्याही संस्थेचे आजपर्यंत झाले नाहीत. हा लेखी इतिहास आहे. आम्हाला या सगळ्या उपक्रमामध्ये सुरुवातीच्या काळामध्ये प्राचार्य अण्णासाहेब हिवसे यांनी समर्थपणे साथ दिली. नंतरच्या काळात आजचे खासदार व तेव्हाचे आमदार व कृषी मंत्री मा डाँ. अनिल बोंडे साहेब यांनी ही कल्पना उचलून धरली. रोजगार मिळावे, स्पर्धा परीक्षा कार्यशाळा, करियर गायडन्स,आयएएस विद्यार्थ्यांचे सत्कार नावीण्यपूर्ण उपक्रम आमच्या या सर्व उपक्रमांना त्यांनी सर्व प्रकारचे बळ दिले .खरं म्हणजे हे उपक्रम सर्वच लोकप्रतिनिधींनी राबवायला पाहिजे होते .पण डॉ..अनिल बोंडे यांना या कामात रुची होती. ते त्यांच्या मुलीला मनालीला घेऊन माझ्या घरी आले होते आणि हिला आयएएस करायचे आहे. तुम्ही गायडन्स करा. अशी मला विनंती केली होती. आज आम्ही जेव्हा अमरावती जिल्ह्यातील मोर्शी मतदारसंघाकडे वळून पाहतो तेव्हा मला अभिमान वाटतो की या मोर्शी व वरुड तालुक्यामध्ये स्पर्धा परीक्षेच्या बाबतीत करिअरच्या बाबतीत प्रचंड जनजागृती झालेली आहे आणि त्यासाठी आपल्याला श्रेय द्यावे लागेल आमच्याबरोबरच खासदार डाँ. अनिल बोंडे यांना. कारण त्यांनी अमरावती जिल्ह्यातील वरुड मोर्शी मतदार संघातील प्रत्येक गावात,प्रत्येक शाळेत, प्रत्येक महाविद्यालयात आमच्या स्पर्धा परीक्षेच्या करिअर उद्योजकता विकासाच्या कार्यशाळा आयोजित केल्या आणि आपल्या भागातील आयएएस अधिकारी आयपीएस अधिकारी आय आर एस अधिकारी, आयएएस टॉपर, एमपीएससी टॉपर,यांना वेळोवेळी निमंत्रित करून प्रचंड जनजागृती केली .आज या मतदारसंघात कोणताही माणूस गेला तर करिअरच्या बाबतीत अगदी तुम्हाला जनजागृती झालेली असेल .तर दुर्दैवाने ते अमरावती जिल्ह्यातील म्हणा किंवा इतर जिल्ह्यात अशा प्रकारचे उपक्रम राबविण्यात आले नाहीत .साधारणपणे निवडणुका आले की सगळे लोकप्रतिनिधी कामाला लागतात आणि निवडणूक झाले की ते रितसर विसरतात. तसे पाहिले तर अनेक लोकप्रतिनिधी त्यामध्ये मंत्रीपण आहेत माझे विद्यार्थी आहेत .पण या माझ्या मंत्री विद्यार्थ्यांनी माझे उपक्रम राबवले नाहीत .बोंडे साहेब माझे विद्यार्थी नाहीत. ते माझ्या आयुष्याच्या उत्तरार्धामध्ये माझ्या संपर्कात आले. पण त्यांना पटलं ही स्पर्धा परीक्षा करिअर गायडन्स रोजगार मिळावे नाविन्यपूर्ण उपक्रम कौशल्य विकास हे आवश्यक आहेत आणि मग त्यांनी मला हाताशी धरलं. मला आवश्यक त्या सुविधा सर्व बाबतीत पुरवल्या. मी तर महाराष्ट्रातील दिग्गज लोकांकडे स्पर्धा परीक्षा कार्यशाळा घेतलेल्या आहेत .त्यामध्ये मा.श्री शरद पवार,मा. श्री पतंगराव कदम,मा.श्री डी वाय पाटील, मा. श्री दत्ता मेघे यांच्याकडे कार्यशाळा घेतल्या. माझ्या व्रताप्रमाणे मी कोणाकडूनही एक रुपया मानधन घेतले नाही .
बोंडेसाहेबांना आपल्या भागातील विशेषतः त्यांच्या अमरावती जिल्ह्यातील मतदारसंघातील लोकांविषयी खूप तळमळ. कोणताही कार्यक्रम असला तरी ते मला आणि प्रा.शिवाजी कुचे यांना त्यामध्ये आमंत्रित करायचे .आम्ही अक्षरशः मोर्शी आणि वरुड हा मतदारसंघ पिंजून काढला. सकाळी आठ वाजता बोंडे साहेबांची गाडी यायची. दिवसभर मतदारसंघात कार्यक्रम व्हायचे. नियोजन ठरलेले असायचे .ते शाळा ते गाव तयार असायचे .या दहा वर्षात आम्ही अगदी लहानातल्या लहान शाळेत त्यामधून जिल्हा परिषदेच्या शाळा पण सुटल्या नाहीत. वस्तीगृह पण सुटलेले नाही. आणि खाजगी कोचिंग क्लासेसही सुटलेले नाहीत. अशाप्रकारे जनजागृती केली. आज योगायोगाने डॉ. अनिल बोंडे खासदार आहेत आणि त्यांच्याच पुढाकाराने त्यांच्या हस्ते उद्घाटन होऊन या रोजगार मेळाव्याचे गायडन्स सेमिनारचे उद्घाटन होत आहे ही खरोखरच त्यांनी केलेल्या कार्याची पावती आहे असेच म्हणावे लागेल .आपण सर्वजण विकासाच्या गोष्टी करतो .पण त्या प्रत्यक्ष उतरायला प्रॅक्टिकल करावे लागते. दुर्दैवाने बोलणे आणि वागणे या मला यामध्ये खूपच अंतर जाणवते .साधारणतः सर्वांची धाव पुण्या मुंबईकडे किंवा परदेशाकडे आहे .पण मला खात्री आहे की विद्यार्थ्यांनी खऱ्या अर्थाने स्वतःला तत्पर तेजस्वी व तपस्वी केले तसेच वेळेचे तंतोतंत नियोजन केले तर विदर्भातील विद्यार्थी कुठल्याही बाबतीत कमी नाही. विदर्भातील मुलांजवळ सर्व प्रकारच्या गोष्टी आहेत. पण त्या त्याला समर्थपणे व्यक्त करता येत नाहीत.अनेक विद्यार्थ्यांच्या ठिकाणी न्यूनगंड आहे .आपल्याला इंग्रजी येत नाही. आपली इंग्रजी चांगली नाही .असे त्याला सातत्याने वाटत असते .त्यासाठी आम्ही आमदार अनिल बोंडे साहेबांच्या सूचनेवरून शिवाजी कुचेंना सोबत घेतले. शिवाजी कुचे तेव्हा स्पीक इझी या नावाने क्लास घेत होते आणि डाँ.अनिल बोंडे साहेब त्यांच्या पाठीशी उभे राहिले .आज अमरावतीकरांना माझी आणि शिवाजी कुचेंची तारीख घ्यावी लागेल इतका आमचा कामाचा व्याप वाढलेला आहे .याला कारण खासदार डॉ. अनिल बोंडे यांनी दिलेली समर्थ साथ असेच म्हणावे लागेल. त्यामध्ये इतरही लोकप्रतिनिधींचा थोड्याफार प्रमाणात सहभाग आहे .
परवा अमरावतीला एक प्रचंड मोठे आयएएस केंद्र उपमुख्यमंत्री मा. श्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटित झाले. विदर्भ महाविद्यालयातील हे केंद्र म्हणजे आज संपूर्ण महाराष्ट्राचे आकर्षण झालेले आहे . इतके सुंदर सेंटर आज तरी महाराष्ट्रात कुठेही नाही .आपण मंदिरात जातो शेगावला जातो कोल्हापूरला जातो शिर्डीला जातो त्याप्रमाणे काही तासांचा अवधी काढून या आयएएस सेंटरला भेट दिली पाहिजे .या ठिकाणी स्पर्धा परीक्षेला बसणाऱ्या मुलांसाठी राहणे जेवणे कोचिंग आणि इतर प्रकारच्या सगळ्या सुविधा शासनातर्फे उपलब्ध आहेत .त्यासाठी तुम्हाला पैसे मोजावे लागत नाही. त्यासाठी डॉ. अनिल बोंडे आमचे मित्र डॉ. सुनील देशमुख व इतर लोकप्रतिनिधींनी चांगले परिश्रम घेतलेले आहेत. आणि अमरावतीचे नाव महाराष्ट्राच्या नकाशावर शासकीय आयएएस कोचिंगच्या बाबतीत ठळकपणे नमूद केलेले आहे .शिव खेडाचे एक वाक्य आहे .त्यामध्ये ते म्हणतात. जितने वाले कोई अलग काम नही करते वे हर काम अलग ढंगसे करते है. हे ब्रीद वाक्य लक्षात ठेवून विद्यार्थ्यांनी कामाला लागणे गरजेचे आहे. आपल्याकडे एखादा हिरो आणि हिरोईन आले की प्रचंड जनसमुदाय जमा होतो आणि विद्यापीठात किंवा सांस्कृतिक भवनमध्ये एखादे चांगले करिअरच्या संदर्भात चांगले व्याख्यान असले तर त्याला मात्र गर्दी जमत नाही .आपल्या मुलांनी चांगल्या रीतीने सतर्कपणे शिक्षण करियर उद्योजकता नाविन्यता याकडे लक्ष दिले पाहिजेत .आम्ही ते दिले आहे .आम्ही दुसऱ्या वर्गापासूनच मुलांना तयार केले आहे. आमचा दुसरीतला मुलगा उत्कृष्ट भाषण देऊ शकतो .कालच आमच्या मिशन आयएएसचा सदस्य व तिसरी पास झालेला अर्णव चांडक एका संस्कार शिबिरात भाषण देऊन आला .मुलगा लहान .भाषण दिलं. त्याचे सादरीकरण शिक्षकांना व विद्यार्थ्यांना इतके आवडले की अगदी शिक्षकांनीही त्याच्याबरोबर फोटो काढले .म्हणून मुलांचे व्यक्तिमत्व चांगले करणे गरजेचे असते .ते अशा प्रकारच्या कार्यक्रमातून घडत असते .कोणतीही गोष्ट एका दिवसातून होत नाही. केवळ डॉक्टर आणि इंजिनियर हेच आपलं ध्येय असू नये. लिओ टाँलस्टायची एक कथा आहे .हाऊ मच लँड डझ ए मँन रिक्वायर्ड माणसाला जीवन जगण्यासाठी किती जागा लागते ? आणि याचे उत्तर आहे. सात बाय तीन. आणि माणूस उगीचच पैशामागे लागून आपले जीवन व्यर्थ गमावत असतो आणि म्हणून अशा प्रकारचे करियर उद्योजकता नाविन्यता रोजगार देणारे सेमिनार वारंवार झाले पाहिजेत .शासनाने ते पाऊल उचलले आहे .पण नुसतं पाऊल उचलून चालणार नाही. त्याची समर्थपणे अंमलबजावणी झाली पाहिजे त्यासाठी डॉ. अनिल बोंडे यांनी ज्याप्रमाणे आपल्या मतदारसंघात प्रचंड जनजागृती केली आणि विद्यार्थ्यांना जागे केले शिक्षकांना जागे केले त्याप्रमाणे जागे केले पाहिजे आणि किमान अमरावती विभागातील लोकप्रतिनिधी हे कार्य स्वीकारतील अशी त्यांच्याकडून अपेक्षा आहे आणि आपले विद्यार्थी चांगले तयार झाले,कर्तृत्ववान झाले त्यांच्या मनातून न्यूनगंड निघून गेला तर ते तत्पर तेजस्वी व तपस्वी झाले तर मराठी पाऊल पडते पुढे हे वाक्य यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही .या उद्योजकता करिअर गायडन्स रोजगार नाविन्यपूर्ण उपक्रमाला मी मनापासून शुभेच्छा देतो आणि अशा प्रकारच्या उपक्रमासाठी मी २४ तास उपलब्ध आहे .त्यासाठी कुठल्याही प्रकारची मानधनाची अपेक्षा नाही.. तर साथी हात बढाना एक अकेला थक जायेगा मिलकर बोझ उठाना या न्यायाने आपण एकत्र येऊ या आणि माणूस द्या मज माणूस द्या हा राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा संदेश खऱ्या अर्थाने समाजामध्ये रुजवण्यासाठी पंजाबरावांचा खडू आणि श्री संत गाडगेबाबांचा झाडू हातात घेऊन आपल्या भागातील झालेला अंधार असणारा अंधार दूर करण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करू या .
मावळत्या सूर्याने या जगाला प्रश्न केला .माझं काम माझ्या नंतर कोण करेल कोणीच उत्तर दिलं नाही एक मिणमिणती पणती म्हणाली भगवान मी माझ्या परीने प्रयत्न करेन ..अशा पणत्या प्रत्येक गावात पेटल्या तर आपला मराठी माणूस पुढे गेल्याशिवाय राहणार नाही .
==============
*प्रा. डाँ. नरेशचंद्र काठोळे*
संचालक मिशन आयएएस अमरावती महाराष्ट्र 444602.मो.9890967003

*संवाद मिडिया*

*_🏠तुमच्या स्वप्नाला वळण देणारा, एक सुंदर प्रयत्न जो बदलेल तुमच्या जीवनाला !!!!🏠_*

*⚜️”रॉयल सिटी पार्क” मुंबईतील नामांकित बिल्डर्सचा ऐश्वर्य संपन्न गृहप्रकल्प प्रत्यक्ष रत्नागिरीत !⚜️*

*▫️*वैशिषट्यपूर्ण घरकुलाची सुसज्य मांडणी आणि आधुनिक सुविधांनी परिपूर्ण वास्तूचे रूप, आपल्याला इथेच पाहायला मिळेल. मुंबई पद्धतीने बनवलेला डिलक्स फ्लॅट तोही सर्वसामान्यांना परवडेल असा. त्याच प्रमाणे *_NO GST / OC COMPLETE / READY POSSESSION._*

💫 *_आपल्या प्रोजेक्टची खास वैशिषट्ये_* 💫

*१) रेडीमेड मॉड्यूलर किचन ट्रॉलीसहित .*
*२) बाथरुम जग्वार फिटिंग, पूर्ण फ्लॅट कंन्सिल्ड इलेक्ट्रिक, ट्यूब्स, फॅन, गिझर, एक्झॉस्ट फॅन, बल्ब फिटींग,*
*३)पूर्ण फ्लॅट पी.ओ.पी मोल्डींग*
*४) वॉकिंग ट्रॅक, चिलड्रन्स प्ले गार्डन*
*५) अत्याधुनिक लिफ्ट (ISI mark)*
*६) आकर्षक इंट्रन्स लॉबी, रेन वॉटर हार्वेस्टिंग.*
*७) भरपूर पाणी , प्रशस्त पार्किंग व्यवस्था.*
*८) जवळच शाळा , मंदिर , मार्केट.*
*९) १००% गृहकर्ज सुविधा उपलब्ध.*

🌐 *प्रोजेक्टच्या अधिक माहिती साठी या लिंक वर क्लिक करा*👇🏻
https://royalcitypark.in

*☎️ बुकिंग संपर्क ☎️*

Rakhi : 9209193470.

Mahesh Bhai :9820219208.

Sharad : 8600372023.

🛑 *साईटचा पत्ता* 🛑

*रॉयल सिटी पार्क, रवींद्र नगर ,सेंट थॉमस स्कूल जवळ , (श्री स्वामीसमर्थ मठ) कारवांची वाडी, कुवारबाव रत्नागिरी*

📢 *मोजकेच फ्लॅट शिल्लक, आजच बुक करा*
————————————————

 

प्रतिक्रिया व्यक्त करा

twenty − seventeen =