You are currently viewing उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. उत्तम पाटील यांना मुदतवाढ

उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. उत्तम पाटील यांना मुदतवाढ

सावंतवाडी

सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. उत्तम पाटील यांना शासनाने मे २०२२ पर्यंत एक वर्षाची मुदतवाढ दिली आहे. याबाबतचे अधिकृत पत्र त्यांना प्राप्त झाले आहे. डॉ. पाटील हे आज ३१ मे २०१८ रोजी सेवा निवृत्त होणार होते. त्यानंतर त्यांना सुरुवातीला दोन वर्ष व त्यानंतर एक वर्षाची मुदतवाढ देण्यात आली होती.

हा कालावधी आज ३१ मे रोजी संपुष्टात येणार होता. या पार्श्वभूमीवर कोरोना संसर्ग काळात त्यांनी केलेले चांगले काम यामुळे त्यांना शासनाकडून वैद्यकीय अधीक्षक पदाची एक वर्षाची मुदतवाढ देण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी यांनीही डॉक्टर उत्तम पाटील यांनी काही काळ सेवा द्यावी असे आवाहन केले होते. त्या पार्श्वभूमीवर त्यांना ही मुदत वाढ मिळाली असून या वृत्ताला डॉ. पाटील यांनी दुजोरा दिला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

three × three =