You are currently viewing रानबांबुळी येथील रक्तदान शिबिराला मोठा प्रतिसाद

रानबांबुळी येथील रक्तदान शिबिराला मोठा प्रतिसाद

ओरोस

रक्तदान श्रेष्ठदान हा हेतू समोर ठेवून छत्रपती प्रतिष्ठान युवा मंडळ रानबांबुळी च्यावतीने रानबांबुळी प्राथमिक शाळा नंबर १ येथे आयोजित रक्तदान शिबिरात ५५ रक्तदात्यांनी रक्तदान केले.

छत्रपती प्रतिष्ठान युवा मंडळ रानबांबुळी हे मंडळ नेहमीच विविध समाजोपयोगी उपक्रम राबवित असते. यावेळी या मंडळाने रानबांबुळी प्राथमिक शाळा नंबर १ येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

या शिबिराचे उद्घाटन सरपंच परशुराम परब यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी उपसरपंच सुभाष बांबुळकर, छत्रपती प्रतिष्ठान युवा मंडळ रानबांबुळीचे अध्यक्ष शुभम परब आदी उपस्थित होते. या रक्तदान शिबिराला रक्तदात्यांकडून चांगला प्रतिसाद लाभला मिळाला. या शिबिरात एकूण ५५ रक्तदात्यांनी रक्तदान केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

7 − 5 =