You are currently viewing उंबर्डे येथे एसटी व टँकर यांच्यात अपघात : दोन्ही वाहनांचे नुकसान

उंबर्डे येथे एसटी व टँकर यांच्यात अपघात : दोन्ही वाहनांचे नुकसान

टँकर चालकावर गुन्हा दाखल

वैभववाडी

उंबर्डे महबुबनगर येथील वळणावर एस.टी. आणि टॕंकर यांच्यात जोरदार धडक झाली. या अपघातात दोन्हीही वाहानांच्या दर्शनी भागाचे नुकसान झाले आहे. टॕकरचालक व क्लीनर यांना किरकोळ दुखापत झाली आहे. हा अपघात शुक्रवारी सकाळी ६.१५ वा. सुमारास घडला. सुदैवाने एस.टी.बसमधील कोणीही प्रवाशी जखमी झालेले नाही. अपघात प्रकरणी टॕकरचालकावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
याबाबत एस.टी.बस चालक पंढरीनाथ बाबू फाले वय ३६ रा.सांगुळवाडी मगामवाडी यांनी वैभववाडी पोलिस ठाणेत फिर्याद दिली आहे. चालक श्री फाले आपल्या ताब्यातील एस.टी.बस क्र.एमएच २० डिएल २१३२ ही बस भुईबावडा रिंगेवाडी ते कणकवली, ही रिंगेवाडी येथे वस्तीला असलेली बस शुक्रवारी सकाळी ५.५० वा. रिंगेवाडी येथून उंबर्डे खारेपाटण मार्गे कणकवलीला घेऊन जात होते. बस उंबर्डे महबुबनगर येथील पहील्या वळणावर आली. यावेळी बसचालकाला समोरुन पेट्रोल डिझेल टॕकर येत असलेला दिसला. वळण असल्यामुळे बसचालकाने बस रस्त्याच्या डाव्या बाजूला वेग कमी करुन उभी केली. तोपर्यंत समोरुन येणाऱ्या टॕकर चालकाचा टॕकरवरील ताबा सुटला. तो उभ्या केलेल्या एस.टी.बसवर धडकला. या अपघातात एस.टी.बस.मधील कोणीही जखमी झाले नसले तरी एस.टी.बस च्या दर्शनीभागाची काच, हेडलाईट, साईट पॕनल तुटल्यामुळे दर्शनी भागाचे नुकसान झाले. तर या अपघातात टॕंकरचालक जहागीर फरदीन कलाल व क्लिनर आदिल जहागीर कलाल दोघेही रा. मालगाव ता.मिरज जि. सांगली यांच्या पायाला मुका मार लागला आहे. या अपघात प्रकरणी टॕंकर चालक जहागीर कलाल याच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

3 × 5 =