“पत्रकारांच्या प्रश्नांबाबत आपण लक्ष घालू” – ना. शरद पवार यांचे आश्वासन

“पत्रकारांच्या प्रश्नांबाबत आपण लक्ष घालू” – ना. शरद पवार यांचे आश्वासन

मुंबई :

मराठी पत्रकार परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा आणि महाविकास आघाडी चे प्रणेत शरद पवार यांची भेट घेऊन पत्रकारांच्या विविध प्रश्नांकडे त्यांचे लक्ष वेधले, यामध्ये त्यांनी पत्रकारांना फ्रंट वर्करची मान्यता देण्यात यावी ही प्रमुख मागणी केली. मराठी पत्रकार परिषद, मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघ, टीव्हीजेए आणि बीयुजे या संघटनांच्या एका शिष्टमंडळाने एस.एम.देशमुख यांच्या नेतृत्वाखाली शरद पवार यांची त्यांच्या मुंबईतील सिल्व्हर ओक या निवासस्थानी भेट घेऊन पत्रकारांना फ़न्टलाईन वर्कर म्हणून मान्यता मिळावी अशी मागणी केली..

राज्यात १४२ पत्रकार कोरोनाचे शिकार ठरले असताना देखील सरकार पत्रकारांच्या विषयाकडे पूर्णता दुर्लक्ष करीत असल्याची बाब ही शिष्टमंडळाने शरद पवार यांच्या निदर्शनास आणून दिली. पत्रकार पेन्शन, पत्रकारांवरील हल्ले, पत्रकार आरोग्य योजना, अधिस्वीकृती समितीचे पुनर्गठण, मुंबईतील पत्रकारांना लोकलमधून प़वास करण्याची सुविधा आदि विषय देखील शिष्टमंडळाने पवार यांच्या कानावर घातले आणि पत्रकारांच्या विविध प्रश्नांबाबत आपण लक्ष घालावे अशी विनंती त्यांना केली. “पत्रकारांच्या प्रश्नांबाबत आपण लक्ष घालू” असे आश्वासन शरद पवार यांनी शिष्टमंडळाला दिले..

शिष्टमंडळात एस.एम.देशमुख, मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाचे अध्यक्ष मंदार पारकर, टीव्हीजेएचे अध्यक्ष विनोद जगदाळे, बीयुजेचे जॉइन्ट सेक्रेटरी सुरजसिंह ठाकूर, आदि सहभागी झाले होते. यावेळी मराठी पत्रकार परिषदेचे कार्याध्यक्ष शरद पाबळे दीपक कैतके उपस्थित होते..

पत्रकारांच्या वरील संघटनांनी यापुर्वी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेऊन त्यांच्याकडेही पत्रकारांना फ़न्टलाईन वर्कर म्हणून जाहीर करण्याची विनंती केली आहे..यावेळी एस एम देशमूख यांनी संघर्षाची पंच्याहत्तरी हे मराठी पत्रकार परिषदेचा इतिहास सांगणारे तसेच कथा एका संघर्षाची ही दोन पुस्तके शरद पवार यांना भेट दिली.

प्रतिक्रिया व्यक्त करा