You are currently viewing “मराठी भाषेचे संवर्धन व विकसन यांचे संस्कार विद्यार्थ्यांवर व्हावे” – माधुरी विधाटे

“मराठी भाषेचे संवर्धन व विकसन यांचे संस्कार विद्यार्थ्यांवर व्हावे” – माधुरी विधाटे

विशाल नगर, पिंपळे निलख (प्रतिनिधी- बाबू डिसोजा कुमठेकर) :

 

“मराठी भाषेचे संवर्धन व विकसन यांचे संस्कार विद्यार्थ्यांवर व्हावे” असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक माधुरी विधाटे यांनी केले. ज्येष्ठ साहित्यिक विष्णू वामन शिरवाडकर ऊर्फ कुसुमाग्रज ह्यांच्या जयंती निमित्त विद्या विनय निकेतन प्राथमिक शाळा, विशाल नगर, पिंपळे निलख येथे मराठी भाषा गौरव दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानावरून त्या बोलत होत्या. याप्रसंगी विशालनगर येथील नगरसेविका मा.आरतीताई चोंधे व शाळेच्या मुख्याध्यापिका मा. नूतन भांबुरे मॅडम व इतर शिक्षक वृंद, विद्यार्थी आणि पालक सहभागी होते.

सदर कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी मराठी दिनाविषयी महती सांगून मराठी गौरव गीते सादर केली. तसेच पाठ्यपुस्तकातील विविध कवींच्या कवितांचे सामुहिक सादरीकरण केले. मान्यवरांनी मराठीतून स्वतःची स्वाक्षरी केली. तसेच माधुरी विधाटे लिखित मराठी भाषेविषयी अभिमान बाळगण्यासाठीची प्रतिज्ञा सर्वांनी घेतली. छत्रपती शिवाजी महाराज आणि विविध संतांच्या वेशात सजलेल्या विद्यार्थ्यांनी ग्रंथदिंडीत सहभाग घेतला. या सुंदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इयत्ता सातवी जुई तील विद्यार्थ्यांनी केले व कार्यक्रमाचे नियोजन ग्रंथालयप्रमुख रुबीका खरात, मनीषा मुंडे, सुनीता गावडे, कल्पना गजरे, हसीना पठाण यांनी व सहशिक्षकांनी केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

eight + sixteen =