अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने वेंगुर्लेतील शिक्षकांचा गौरव

अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने वेंगुर्लेतील शिक्षकांचा गौरव

राष्ट्रीय शिक्षक दिनानिमित्त अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने वेंगुर्लेतील शिक्षकांचा गौरव

वेंगुर्ले / प्रतिनिधी :-

काल ५ सप्टेंबर अर्थात राष्ट्रीय शिक्षक दिन. देशाच्या भावी पिढीचा पाया घडविणा-या शिक्षकांंच्या सन्मानाचा दिवस. देशभरात मोठ्या उत्साहात शिक्षक दिन साजरा करण्यात येतो. मुलांच्या जडणघडणीसाठी मेहनत घेणा-या शिक्षकांचा शिक्षकदिनी सन्मान करण्याच्याउद्देशाने अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघ वेंगुर्ले च्या वतीने तालुक्यातील 35 निवडक उपक्रमशील शिक्षकांना ई सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. सत्कारमूर्तींना यथावकाश कार्यक्रमात सन्मानपत्राची हार्डकाॅपी देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. खरं तर प्रत्येक शिक्षक सन्मानपात्र असतो. परंतू सर्व शिक्षकांचा सन्मान करणे शक्य नसल्यामुळे प्रत्येक केंद्रातील होतकरू 2/3 उपक्रमशील शिक्षकांचा प्रातिनिधीक स्वरूपात गौरव केला आहे. अखिल वेंगुर्ला प्राथमिक शिक्षक संघाचे तालुकाध्यक्ष एकनाथ जानकर सरचिटणीस सागर कानजी व पदाधिकारी यांनी सर्व शिक्षक बंधू भगीनींना शिक्षक दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या आहेत

प्रतिक्रिया व्यक्त करा