You are currently viewing कै. श्रीधरराव नाईक यांचा 31 स्मृतिदिनानिमित विविध कार्यक्रमाचे आयोजन..

कै. श्रीधरराव नाईक यांचा 31 स्मृतिदिनानिमित विविध कार्यक्रमाचे आयोजन..

कणकवली :

 

कै. श्रीधरराव नाईक यांचा 31 वा स्मृतिदिन बुधवार 22 जून रोजी सकाळी 10 वाजता कै. श्रीधरराव नाईक चौक कणकवली येथे विविध कार्यक्रमांनी साजरा केला जाणार आहे.

या कार्यक्रमाला सिंधुदुर्गचे पालकमंत्री उदय सामंत, खासदार विनायक राऊत, माजी खासदार ब्रिगेडियर सुधीर सावंत, आमदार वैभव नाईक, जिल्हा संपर्क अरुण दुधवडकर, शिवसेना नेते गौरीशंकर खोत, कोकण पर्यटन विकास समितीचे उपाध्यक्ष संदेश पारकर, शिवसेना नेते सतीश सावंत, अतुल रावराणे, सामाजिक कार्यकर्ते बाळा भिसे हे उपस्थित राहणार आहे.

या स्मृतीदिनानिमित्त रक्तदान शिबिर, ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार आणि मोफत मोतीबिंदू तपासणी या शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. तरी या कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित रहावे, असे आवाहन कार्यक्रमाचे आयोजक कै. श्रीधर नाईक प्रेमी सिंधुदुर्ग यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा