You are currently viewing सावंतवाडीतील विज समस्या तात्काळ सोडवा, अन्यथा उद्रेक झाल्यास अधिकारी जबाबदार -बबन साळगावकर

सावंतवाडीतील विज समस्या तात्काळ सोडवा, अन्यथा उद्रेक झाल्यास अधिकारी जबाबदार -बबन साळगावकर

माजी नगरसेवकांच्या शिष्टमंडळासह विद्युत वितरण कार्यालयाला धडक

सावंतवाडी

विद्युत वितरण कंपनीने शहरातील विजेच्या समस्या तात्काळ सोडवाव्यात, अन्यथा उद्रेक झाल्यास त्याला सर्वस्वी संबंधित अधिकारी जबाबदार राहतील, असा इशारा माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी विद्युत वितरणचे अभियंता संदीप भुरे यांना दिला. दरम्यान शहरात वीज वितरणच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांची मुजोरी दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्याला वेळीच आळा घालण्यात यावा, अन्यथा मागच्या आंदोलना सारखी परिस्थिती या ठिकाणी पुन्हा उद्भवेल, असेही त्यांनी यावेळी सांगितले. शहरात सुरू असलेले अनिमित भारनियमन आणि विविध समस्यांवर आवाज उठवण्यासाठी श्री. साळगावकर यांच्यासह माजी नगरसेवकांच्या शिष्टमंडळाने आज येथील विद्युत वितरणच्या कार्यालयाला धडक दिली.
यावेळी माजी उपनगराध्यक्ष अन्नपूर्णा कोरगावकर, माजी नगरसेवक विलास जाधव, अफरोज राजगुरू, सुरेश भोगटे, उमेश कोरगावकर, उमाकांत वारंग, शुभांगी सुकी, इफ्तिकार राजगुरू आदी उपस्थित होते.
यावेळी श्री. साळगावकर म्हणाले, गेले दोन-तीन महिने शहरात अनियमित भारनियमन सुरू आहे. त्याचा फटका व्यावसायिकांसह नागरिकांना बसत आहे. वारंवार वीज पुरवठा खंडित होत असल्यामुळे विद्युत उपकरणे निकामी होत आहेत. तर यावर आवाज उठविणाऱ्या नागरिक वर सुद्धा गुन्हे दाखल करून विज वितरणचे अधिकारी-कर्मचारी मुजोरी करत आहे. त्यामुळे सामान्य नागरिकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न झाल्यास आम्ही गप्प बसणार नाही, असा इशारा त्यांनी दिला. तर शहरात अनेक ठिकाणी विद्युत उतारावर झाडी वाढली आहे. मात्र ती हटविण्याची कोणतीही कार्यवाही संबंधित प्रशासनाने केलेली. पावसाळ्यात झाडांच्या फांद्या विद्युत तारांवर तुटून पडल्यानंतर पुरवठा खंडित होऊन त्याचा नाहक त्रास नागरिकांना सोसावा लागणार आहे. त्यामुळे पावसाळ्यापूर्वी झाडी हटवा, अशीही मागणी त्यांनी केली आहे..

प्रतिक्रिया व्यक्त करा

seventeen + 19 =