हार्दिक-कृणाल यांचा अश्रूंचा बांध फुटला; वडिलांना अखेरचा निरोप….

हार्दिक-कृणाल यांचा अश्रूंचा बांध फुटला; वडिलांना अखेरचा निरोप….

वृत्तसंस्था :

भारतीय क्रिकेटपटू हार्दिक पांड्या व कृणाल पांड्या यांच्या वडील, हिमांशू पांड्या यांचे शनिवारी हृदयविकाराच्या धक्क्यानं निधन झालं. त्यांना अखेरचा निरोप देताना पांड्या बंधुंना अश्रू अनावर झाले होते.

कृणाल सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी ट्वें-20 स्पर्धेत खेळत होता आणि ही बातमी समजताच त्यानं बायो-बबल कवच सोडून तो घरात परतला. आता तो स्पर्धेत पुढील सामन्यात खेळणार नाही. हार्दिक आणि त्याची पत्नी नताशा स्टँकोव्हिच हेही वडोदरात दाखल झाले. त्यावेळी दोन्ही भावांचा अश्रूंचा बांध फुटला. या दोघांनी एकत्र वडिलांच्या चितेला अग्नी दिला.

सुरत येथे हिमांशू यांचे कार फायनान्सचा बिस्नेस होता आणि तो त्यांनी बंद करून ते वडोदरा येथे स्थायिक झाले. त्यांनी दोन्ही मुलांना किरण मोरे क्रिकेट अकादमीत प्रवेश मिळवून दिला. गोरवा येथे भाड्याच्या अपार्टमेंटमध्ये ते रहायचे.

हार्दिक आणि कृणाल या दोघांनाही क्रिकेटपटू बनवण्यात हिमांषू यांचे मोठे योगदान आहे. त्यांनी अनेक त्याग करून या दोघांनाही यशस्वी क्रिकेटपटू बनवले. काही दिवसांपूर्वी MI TVसोबत या दोघांबाबत बोलताना हिमांशू भावूक झाले होते. ते म्हणाले,”हार्दिक व कृणाल विषयी बोलताना मला अश्रू अनावर होत नाहीत. आम्ही त्यांना लहानवयापासूनच क्रिकेट खेळू दिले. आमच्या या निर्णयावर अनेकांनी प्रश्न उपस्थित केले आणि नातेवाईकांनी टीकाही केली. पण, आम्ही आमच्या निर्धारावर ठाम राहीलो आणि या दोघांनी जे यश मिळवलंय, ते पाहून अभिमान वाटतो.”

प्रतिक्रिया व्यक्त करा