You are currently viewing झाराप येथे अवैध दारू वाहतुकीवर कारवाई

झाराप येथे अवैध दारू वाहतुकीवर कारवाई

५६ लाखांचा मुद्देमाल केला जप्त;
उत्पादन शुल्कच्या कुडाळ पथकाची कारवाई

बांदा

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कुडाळ पथकाने मुंबई गोवा महामार्गावर झाराप येथे मालवाहतूक ट्रक मधून होणाऱ्या बेकायदा दारू वाहतुकीवर कारवाई करत ५६ लाख १६ हजार ९२० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी चालक संतोष बलराम कर (वय ३३ मुळ रा. ओडीशा, सध्या रा. एम ब्लॉक २०१, देवश्री ग्रीन मालदी गोवा रोड पर्वरी उत्तर गोवा) याचेवर अटकेची कारवाई करण्यात आली.

बेकायदा दारू वाहतूक होणार असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार झाराप येथे सापळा रचण्यात आला होता. गोव्याहून मुंबईच्या दिशेने जाणारा मालवाहतूक सहाचाकी वाहन टेम्पो (एमएच १८ बीजी ७७२३) तसेच सदर टेम्पोला पायलटींग करणारी पांढ-या रंगाची इन्होवा कार (एमएच०४ डीआर २७८६) दारुबंदी कायद्यांतर्गत जप्त करण्यात आली.
ट्रक मध्ये ३१ लाख ६ हजार ९२० किंमतीची गोवा बनावटीच्या विविध ब्रँड ची दारू जप्त करण्यात आली. दारुसह वाहतुकीसाठी वापरण्यात आलेल्या वाहनासहीत एकुण ५६ लाख १६ हजार ९२० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
सदरची कारवाई विभागीय उपायुक्त व सिंधुदुर्ग अधीक्षक डॉ. बी. एच. तडवी यांच्या मार्गदर्शनाखाली कुडाळचे निरीक्षक ए. ए. पाडळकर, दुय्यम निरीक्षक डि. एम. वायदंडे, दुय्यम निरीक्षक आर. बी. मोरे, सहायक दुय्यम निरीक्षक आर. डी. ठाकुर, जवान वाहनचालक एच. आर. वस्त, जवान एस. एम. साळुंखे, जवान वाहनचालक आर. एस. शिंदे, जवान डि. आर. वायदंडे यांनी केली. पुढील तपास निरीक्षक श्री. पाडळकर करत आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा