You are currently viewing नारायण राणेंना अटक न झाल्यास सिंधुदुर्गमध्ये जनआशीर्वाद यात्रा रोखण्याचा शिवसैनिकांचा पवित्रा

नारायण राणेंना अटक न झाल्यास सिंधुदुर्गमध्ये जनआशीर्वाद यात्रा रोखण्याचा शिवसैनिकांचा पवित्रा

*सिंधुदुर्ग मध्ये शिवसैनिक आक्रमक*

*नारायण राणेंवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यासाठी ठिकठिकाणी आंदोलने*

नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या बद्दल आक्षेपार्ह विधान केल्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिवसेना आक्रमक झाली असून नारायण राणेंवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यासाठी ठिकठिकाणी शिवसैनिकांकडून निदर्शने करण्यात येत आहेत.
कुडाळ ,मालवण,कणकवली देवगड, आचरा, इत्यादी ठिकाणी नारायण राणेंचा प्रतिकात्मक पुतळा करून त्यांच्या वक्तव्याचा निषेध व्यक्त करण्यात आला.नारायण राणेंवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक न झाल्यास सिंधुदुर्ग मध्ये नारायण राणेंची जन आशीर्वाद यात्रा रोखणार असल्याचा पवित्रा शिवसैनिकांनी घेतला आहे. राणेंच्या विरोधात घोषणा देत शिवसैनिकांनी परिसर दणाणून सोडला. सिंधुदुर्ग जिल्ह्यात सर्वत्र नारायण राणेंच्या विरोधात आंदोलने करण्यात येत आहेत.शिवसैनिक आक्रमक झाले आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा