You are currently viewing सोनसकाळी!!अवनीचा सांगावा!!

सोनसकाळी!!अवनीचा सांगावा!!

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्माननीय सदस्य लेखक कवी बाबा ठाकूर लिखित अप्रतिम काव्यरचना*

*सोनसकाळी!!अवनीचा सांगावा!!*

निळ्या ढगांच्या छातीवर
माळ पुंजक्यांची झुलते
हात गुंफल्या फांद्यामधुनी
मधुरशीळ कानी पडते…!

रातीच्या पायातलं पैंजण
हळूवार वाजायचं थांबतं
हात गळ्यातले काढून
पहाटेला काढून ठेवतं..!

गर्द हिरव्या सळसळीतून
झुळझुळ पाणी वाहतं
किरणस्पर्शांशी लपंडाव खेळतं
सोनसकाळी सोनं लुटतं..!

फांदीवरचे पक्षी अलगद
भक्तीभावाने धरतीवर उतरतातं
खाली माथा टेकवून
परत फांदीवर विराजतातं..!

अवनीच्या सांगाव्यातून अनंताला
आत्मनादानं नादमधुरता येते
सृजनध्वनीला जाग सोनसकाळी
श्रीमुखांनी मीलनराग गाते..!

बाबा ठाकूर

 

*संवाद मीडिया*

*🎊सुवर्णसंधी..!!🎊सुवर्णसंधी..!!🎊 सुवर्णसंधी..!!🎊*

*🪙अक्षयतृतीयेच्या शुभमुहूर्तावर🥳 हक्काचे घर खरेदी🏡 करणार्‍या ग्राहकांना👥सुवर्णसंधी…!!🎊*

*🛣️कुडाळ येथील प्रसिध्द छत्रपती शिवाजी पार्क🌆 मध्ये फ्लॅट🏢 बूक करा🏷️आणि मिळवा 🤗तब्बल 2️⃣ लाखाच्या वस्तू🛍️*

*_🛣️कुडाळ शहराच्या🌆 मध्यभागी सर्व सुविधांनी 🤗युक्त फ्लॅट 🏢घेण्याचे स्वप्न पुर्ण करा..!!🤩_*

*🔸३२ इंची एलईडी टीव्ही🖥️*
*🔹विंडो एसी सी वन टन🥶*
*🔸सिंगल डोर फ्रीज🚪*
*🔹टीव्ही युनिट📺*
*🔸फाईव्ह सीटर सोपासेट🛋️*
*🔹थ्री डोर कपबोर्ड👚*
*🔸क्वीन साईज बेड🛏️*
*🔹क्वीन साइज मॅट्रेस विथ पिलो🧽*
*🔸 सेंटर टेबल🪑*
*🔹शु रॅक👟*
*🔸फोटो फ्रेम 5 qty🖼️*

*_👉…आणि बरंच काही…!!🥳_*

*🛑विशेष टिप:- हि ऑफर फक्त अक्षयतृतीये दिवशीच बुकिंग करणाऱ्या ग्राहकांसाठी आहे..!!_*

*🎴आमचा पत्ता-:*
*छत्रपती शिवाजी पार्क*
*_सत्कार हॉटेल रोड, जुना बसस्टॉप समोर, कुडाळ_*

*📲संपर्क:-*
*७०३८२८१२३४ / ९४२२३७९३९९*
*९४२२०६५१८१ / ९४०४७५१५००*

*जाहिरात लिंक*

———————————————-

प्रतिक्रिया व्यक्त करा