महाराष्ट्र प्रभारी एच. के. पाटील सिंधुदुर्ग दौऱ्यावर कोल्हापूर येथे जिल्हाध्यक्ष बाळा यांची चर्चा

महाराष्ट्र प्रभारी एच. के. पाटील सिंधुदुर्ग दौऱ्यावर कोल्हापूर येथे जिल्हाध्यक्ष बाळा यांची चर्चा

शेतकरी व कामगार विरोधी केंद्र सरकारने केलेल्या काळ्या कायद्याच्या निषेधार्थ कोल्हापूर येथे ट्रॅक्टर रॅली चे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रभारी एच.के. पाटील यांच्याशी सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष बाळा गावडे यांनी चर्चा केली. पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यासाठी लवकरच सिंधुदुर्गात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
सोबत अखिल भारतीय काँग्रेसचे सचिव बी. एम. संदिप, सिंधुदुर्ग जिल्ह्याचे संपर्क मंत्री सतेज उर्फ बंटी पाटील, राज्यमंत्री विश्वजीत कदम, सिंधुदुर्ग जिल्हा उपाध्यक्ष इर्शाद शेख, नागेश मोर्ये, सरचिटणीस प्रकाश जैतापकर, महेंद्र सावंत, सचिव बाळू अंधारी,आनंद परूळेकर,अरविंद मोंडकर, देवानंद लुडबे, संतोष टक्के, पल्लवी तारी उपस्थित होते.
यावेळी जिल्हाध्यक्ष यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काँग्रेसच्या संघटने संदर्भात चर्चा केली व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रभारी एच. के. पाटील यांना सिंधुदुर्ग जिल्ह्यात येण्यासाठी आमंत्रित केले. तसेच महाराष्ट्र शासनाचे गृह राज्यमंत्री व सिंधुदुर्ग जिल्ह्याचे संपर्क मंत्री सतेज उर्फ बंटी पाटील यांनी आपण लवकरच सिंधुदुर्गात येणार असल्याचे यावेळी सांगितले.

प्रतिक्रिया व्यक्त करा